शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याची बतावणी करून पंचतारांकित हॉटेलची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 20:48 IST

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याचे सांगत एकाने पुण्यातील पंचतारांकित हाॅटेलची फसवणूक केली अाहे.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याचे खोटे सांगून पुण्यातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलची फसवणुक केल्याप्रकरणी पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने मुंबईतील एका प्रसिध्द उद्योजकाला अटक केली आहे. आदित्य अशोक जोगानी (वय ३९, रा. तहानी हाईट्स, नेपीसी रोड, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

      याप्रकरणी सचिन डिडोळकर (वय ३६, रा़ खराडी) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिडोळकर हे पुण्यातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिक संचालक पदावर कार्यरत आहेत. आरोपीने  मुख्यमंत्र्यांचा अतिरिक्त मुख्य सचिव असल्याची खोटी बतावणी करत जानेवारी २०१८ ते आत्तापर्यंत पंचतारांकित हॉटेलशी ई-मेलद्वारे संपर्क साधला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हॉटेलच्या रिसेप्शनशी स्वत: अ‍ॅडिशनल चीफ सेक्रेटरी नसताना प्रविणसिंह परदेशी यांच्या नावाचा गैर फायदा घेऊन सचिन डिडोळकर यांच्याशी संपर्क साधून स्वत:च्या व मानव शहा, नवी शहा, गीता शहा अशी नावे सांगणाऱ्या व एका महिलेच्या राहण्याची आणि जेवणाची सोय हॉटेलमध्ये करुन घेतली़. तसेच व्हीआयपी सर्व्हिस उपभोगून हॉटेलचे ९५ हजार ९०० रुपयांचे बिल केले. विशेष म्हणजे निघून जाताना त्यांनी हॉटेलचे ओपिनियन रजिस्टरमध्ये स्वत:चा अभिप्रायही लिहिला होता़  हे बिल देण्यासाठी डिडोळकर यांनी वारंवार संपर्क साधल्यानंतरही टाळाटाळ केली़ पैसे न देता फसवणूक केली.

    याप्रकरणी फियार्दींनी पोलिसांत धाव घेतल्यावर प्रकरणाचा संपुर्ण तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र  कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, महिला सहाय्यक निरीक्षक व्ही.एस. चव्हाण आणि त्यांच्या पथकाने आदित्य जोगानी याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आदित्य जोगानी याने यापूर्वी देखील परेदशी डायमंड कंपनी तसेच मुंबई दोन ठिकाणी फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पुरावा म्हणून दिलेले वाहनचालक परवाना जप्त करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़ न्यायालयाने त्याला १० आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.  पुढील तपास सहाय्यक निरीक्षक व्ही.एस. चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलfraudधोकेबाजीPoliceपोलिस