शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेविकेने वाद घातल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 22:58 IST

माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात  उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले.

हडपसर : माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात  उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. मात्र, माजी नगरसेविका पूजा कोद्रे आणि उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे सांगत कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. सकाळी १० ते २ या काळात आंदोलन झाले होते.

माजी नगरसेविका पूजा कोद्रे या कार्यालयाकडील आस्थापना विभागात आल्या होत्या.  उप अधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्या टेबलजवळ येऊन त्यांनी कार्यालयाच्या तळमजल्यावरील बारनिशी विभागाचे प्रवेशद्वारावरील माझ्या नावाचा बोर्ड का काढला? असा जाब विचारला. सदर बोर्ड निखळला होता व धूळ, जाळ्याजळमटे साठल्यामुळे तो बोर्ड बारनिशी विभागामध्ये उभा करून ठेवला होता, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यानुसार तो बोर्ड त्वरित स्वच्छ करून त्याचवेळी पूर्वी आहे तसा पूर्ववत लावण्यात आला. याबाबतचा फोटो त्यांच्या व्हॉटस अपवर पाठविला होता. यापुढे असे होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येईल असे कळविले होते, असेही भुजबळ यांनी सांगितले. मात्र, तरीही कोद्रे यांनी वाद घातला अशी तक्रार भुजबळ यांनी महापालिका आयुक्तांकडे तसेच हडपसर पोलीसांत केली होती. मात्र, हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

कोद्रे याबाबत म्हणाल्या की, क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष असताना दिव्यांगांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागू नये, तळमजल्यावर व्यवस्था व्हावी या सोईसाठी आपण खोली साफ करून घेऊन तेथे बारनिशी विभाग सुरू केला होता. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने बोर्ड लावला होता. आता आचारसंहिता नसतानाही बोर्ड काढण्याचे कारण नाही, असे सांगितले. भुजबळ यांनीही ते मान्य केले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकPoliceपोलिस