टेळेवाडीची यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST2020-12-03T04:21:39+5:302020-12-03T04:21:39+5:30

टेळेवाडी येथील धुळोबा देवाची यात्रा संपूर्ण राहूबेट पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.दिवाळीनंतर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून खबरदारीचा उपाय ...

Telewadi pilgrimage canceled | टेळेवाडीची यात्रोत्सव रद्द

टेळेवाडीची यात्रोत्सव रद्द

टेळेवाडी येथील धुळोबा देवाची यात्रा संपूर्ण राहूबेट पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.दिवाळीनंतर ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय नियमांचे पालन करत तीन दिवस चालणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीकडून घेण्यात आला आहे.यावर्षी फक्त पारंपारिक पद्धतीने धुळोबा देवाची पहाटे महापूजा, अभिषेक करण्यात येणार असून छबिना पालखी मिरवणूक,शोभेचे दारुकाम,लोकनाट्याचा कार्यक्रम याबरोबरच इतर कुठलेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत. भाविक भक्तांनी गर्दी न करता सोशल डिस्टिंक्शनचे पालन करत सहकार्य करण्याचे आवाहन धुळोबा देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

फोटो : धुळोबा देवाचा

0२१२२0२0-दौंड-0२

----------------

Web Title: Telewadi pilgrimage canceled