शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

तंत्रज्ञानामुळे आयुष्य समृद्ध : विवेक सावंत;  पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:00 PM

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. 

ठळक मुद्देज्ञान प्रबोधिनीतर्फे ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावर दोन दिवसीय परिसंवादस्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे : विद्या बाळ

पुणे : ‘आजच्या युगात तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होत आहे. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरकाव केला असून, केवळ नकारात्मक बाबींकडे पाहून बोटे मोडणे उचित नाही. त्यातील सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा,’ असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी केले. ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ‘जीवन गुणवत्ता’ या वेगळ्या विषयावरील दोन दिवसीय परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ, मानसशास्त्रज्ञ मानस मंडल, आयुक्त श्रावण हर्डिकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कुकडे, विद्या बाळ यांनी विचार मांडले. परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांनी केले.या वेळी एकतर्फी तलाकविरुद्ध दीर्घ लढाई दिलेले सय्यदभाई, भटक्या गोपाळ समाजासाठी कार्यरत असणारे नरसिंग झरे, प्रशासकीय अधिकारी शीतल तेली-उगले आणि सेरेब्रल पाल्सी विषयात दीर्घकाळ काम करणाऱ्या दीपा पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘वेगाने बदलणाऱ्या आजूबाजूच्या परिस्थितीत स्वत:च्या आणि इतरांच्या जीवन गुणवत्तेबाबत विचार करणे अनिवार्य झाले आहे. भारतभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी परिषदेच्या माध्यमातून आपले संशोधन निबंध वाचले. येत्या काळाची गरज म्हणून या विषयातील मूलभूत संशोधन प्रकल्प हाती घेण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे प्रतिपादन मुख्य संयोजिका अनघा लवळेकर यांनी केले. सुचरिता गद्रे, सुजल वाटवे, प्रणिता जगताप यांनी या परिषदेचे संयोजक समिती सदस्य म्हणून काम पाहिले.        ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट म्हणाले की, ‘जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यक्तीने तमोगुणाकडून सत्त्वगुणाकडे प्रवास करण्याचा संदेश भारतीय तत्त्वज्ञान सांगते. जीवनव्रती समाजातील अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून त्यांची जीवन गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत असतात.’   विद्या बाळ म्हणाल्या की, ‘जीवन गुणवत्ता बाहेरून मिळवता येत नाही, ती मनाच्या आतून मिळवावी लागते. स्त्रियांचा समाजातील दर्जा वाढवण्यावर भर देणे गरजेचे असून, त्याशिवाय त्यांच्या जीवन गुणवत्तेबद्दल बोलणे शक्य होणार नाही.’

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे