शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

संघर्षाचा वसा जपण्याची शिकवण - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:02 IST

गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे.

पिंपरी - गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते. त्यांच्यातील पिता आणि नेता या दोन्ही भूमिका मी पाहिल्या आहेत. सामान्यांसाठीच्या संघर्षाचा वसा त्यांच्या नेत्याच्या भूमिकेतून मी घेतला आहे. सामान्यांच्या डोळ्यांत त्यांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरविणे हेच माझे कर्तव्य मानले आहे. गोपीनाथ मुंडे यांची तू सुधारित आवृती हो, असे ते मला सांगून गेले आहेत, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पित्याच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी-चिंचवड शहर, तसेच मराठवाडा जनविकास मंच, गोपीनाथ मुंडे फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे आठवणीतले मुंडेसाहेब कार्यक्रम झाला. आमदारलक्ष्मण जगताप, माधुरी मिसाळ, बालहक्क आयोगाचे प्रवीण घुगे, नगरसेवक केशव घोळवे, योगिता नागरगोजे, उद्योजक आबासाहेब नागरगोजे, मराठवाडा जनविकास मंचाचे अरुण पवार, शैलजा मोळक, राजस्थानचे आमदार जस्सीराम कोहली, खंडू खेडकर, बालहक्क आयोगाच्या सदस्या स्वरदा बापट उपस्थित होते.ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, वडिलांशी माझे मैत्री आणि सहजतेचे नाते होते. त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी मला बरोबरीचा दर्जा दिला. माझ्या बहिणींना त्यांच्यातील पिता ही भूमिका माहिती आहे. मी त्यांच्यातील नेता पाहिला, जाणून घेतला. अहंकार त्यांना कधीही शिवला नाही, कधी कोणाला धोका दिला नाही. माणसे जोडण्याची कला त्यांना अवगत होती. विरोधकालाही आपलेसे करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. काहीतरी अपेक्षेने मुंडे साहेबांशीजवळीक साधलेले, त्यांना चिकटलेले होते, ते त्यांच्या निधनानंतर आमच्यापासून दूर गेले. जे त्यांच्या विचारांशी बांधील होते, ते आताही सोबत आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी मला मौलिक सल्ला दिला, मला ज्यांना टाळता आले नाही, त्यांच्यापासून तू दूर राहा. तूच गोपीनाथ मुंडे आहेस, माझ्याकडून जे राहिले ते तू समाजासाठी कर. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याचा माझा प्रयत्न राहील.पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले, की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मानसपुत्र मानले. लढण्याचे, संघर्षाचे बळ दिले. त्यांच्या स्मारकासाठी दहा लाख रुपये आमदार निधीतून देणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी, लोकनेते मुंडे यांचा सहवास लाभला. दळणवळण सुविधा नव्हत्या, वाहनव्यवस्था नव्हती, त्या काळात प्रसंगी एसटीने प्रवास करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. पुणे महापालिकेचा अध्यक्ष असतानाच्या काळात आम्ही त्यांना मोटार घेऊन दिली होती.माजी आमदार गोविंदराव केंद्रे म्हणाले, ‘‘डाव्या आघाडीचा कार्यकर्ता असूनही मी त्यांच्याशी झालेल्या भेटीने प्रभावित झालो. सर्कस चालविणे जसे जिकिरीचे असते, तशा पद्धतीचे त्यांचे काम होते.कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘रायगडसारख्या जिल्ह्यात कार्यकर्ता म्हणून पाय रोवून उभे राहण्याचे धारिष्ट्य मला केवळ लोकनेते मुंडे यांच्यामुळे मिळाले.’’महापौर राहुल जाधव, लोकलेखा समितीचे अ‍ॅड. सचिन पटवर्धन, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.आमच्याकडे माणसांची वाटणीसगळीकडे संपत्तीची वाटणी होत असते. आमच्याकडे मराठवाड्यात मात्र माणसांची वाटणी होताना दिसून येते. जवळची, नात्यातील माणसे विभागली जातात. स्वभाव, गुण यावरून वाटणी होत असते, असे घराणेशाहीतील वाद, मतभेदाचे सूचक वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांनी त्यास दुजोरा दिला.अधिकाºयांनीही सांगितल्या आठवणीपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी लोकनेते मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते गृहमंत्री होते, त्या काळात १९९५ मध्ये त्यांच्याशी पहिली भेट झाली. पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना, जाहीर कार्यक्रमावेळी एका भाजपा नेत्याशी वाद झाला. परंतु त्यांच्यातील नेतेगिरी कधी त्यांनी जाणवू दिली नाही. कधीही चुकीचे काम करण्याचा आग्रह धरला नाही. लक्ष्मीनारायण या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाशी एकदा ते थेट बोलले, तुम्ही माझे काम करीत नाही. उलटे काम करता; परंतु तुम्ही चांगले अधिकारी आहात, असा स्पष्टवक्तेपणा त्यांच्यात होता.पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अध्यक्ष किरण गिते म्हणाले, की २०१३ मध्ये त्रिपुरात काम करीत होतो. मला महाराष्टÑात बदली करून घ्यायची होती. त्रिपुराचे मुख्यमंत्री सोडण्यास तयार नव्हते. बदलीच्या कामासाठी लोकनेते मुंडे यांच्याकडे दिल्लीत गेलो. ते लोकसभेचे उपनेते होते. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी बदलीचा प्रश्न मार्गी लावला. त्या वेळी आवाज देताच, पंतप्रधान कार्यालयातून त्यांच्याकडे अदबीने धावून येणारे अधिकारी पाहिले, तेव्हा त्यांच्यातील लोकनेता खºया अर्थाने अनुभवला.

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडे