शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अपघातात डॉक्टरसह शिक्षकाचा मृत्यू

By admin | Updated: June 11, 2017 03:45 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १.३० वाजता पोंधवडी गावच्या हद्दीत बिल्ट पेपर कंपनीसमोर मोटार आणि ट्रकचा अपघात

- लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री १.३० वाजता पोंधवडी गावच्या हद्दीत बिल्ट पेपर कंपनीसमोर मोटार आणि ट्रकचा अपघात झाला. या घटनेत इंदापूर येथील एक डॉक्टर आणि एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. त्याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला. या अपघातात इंदापूर येथील डॉ. अरुण रामचंद्र शिंदे (वय ४२), तसेच शिक्षक बाळासाहेब अशोक माने (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील पासपोर्ट आॅफिसमधील काम उरकून डॉ. शिंदे आणि शिक्षक माने त्यांच्या स्विफ्ट मोटारीने (एमएच ४२ एच ४१६७) भिगवणहून इंदापूरकडे जात होते. या वेळी बिल्ट कंपनीसमोर लोखंडी पाइप घेऊन जाणाऱ्या ट्रकला (एमएच १२ एचडी २९६९) त्यांची मोटार पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातांची मालिका सुरूचपुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका वाढत आहे. याकडे महामार्ग पोलीस तसेच आरटीओ प्रशासन लक्ष देताना दिसून येत नाही. काही आर्थिक तडजोडींमुळे धोकादायकरीतीने माल भरलेली वाहने बिनदिक्कतपणे वाहतूक करताना दिसून येतात. तसेच जास्तीचा लोड घेऊन वाळूवाहतूक करणारी वाहने सर्रास आढळून येत असली तरी यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या निष्पाप नागरिकांचा यामुळे जीव जात आहे. हा अपघात हे त्याचेच उदाहरण असून पुण्याहून लोखंडी पाइप घेऊन निघालेला या ट्रकवर कारवाई झाली असती तर डॉक्टर आणि शिक्षकाचा जीव यातून नक्कीच वाचला असता.