विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मदतीला शिक्षकच आल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:09 IST2021-05-23T04:09:17+5:302021-05-23T04:09:17+5:30
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम, तालुका अध्यक्ष तुकाराम बेनके, शिरूर हवेली माध्यमिक शिक्षक विचार मंचचे अध्यक्ष ...

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या मदतीला शिक्षकच आल
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम, तालुका अध्यक्ष तुकाराम बेनके, शिरूर हवेली माध्यमिक शिक्षक विचार मंचचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे यांच्या अर्थसाहाय्यातून ही मदत देण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक मारुती कदम, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव रामदास थिटे, सोमनाथ भंडारे, राजाराम ढवळे, प्रा. संजय कदम, मुख्याध्यापक रामनाथ इथापे, शिक्षक सचिन आवारे, कांतीलाल भगत, रोहिदास पोटे, विलास फुंदे, दीपक पवार, सुनील थोरात, शारदा पळसकर, पप्पू कोहकडे, छाया वाघमोडे हे उपस्थित होते.
शिरूर तालुक्यात विविध ठिकाणी विनाअनुदानित शाळेवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोणतेही वेतन नसल्याने त्यांना किराणा साहित्याची मदत करताना समाधान होत असल्याचे कदम, बेनके आणि भंडारे यांनी यावेळी सांगितले.
----------------------------------------------------------------------
२२रांजणगाव गणपती शिक्षकांना मदत
फोटो: शिरूर तालुक्यातील विनाअनुदानित शिक्षक बांधवांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले.