शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक

By प्रकाश गायकर | Updated: April 5, 2024 17:48 IST

सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली

पिंपरी : तुमचे पार्सल मुंबई कस्टममध्ये अडकले आहे. त्यात ड्रग्स व पासपोर्ट असल्याचे सांगून एका तरुणाची ७ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १ ते २ एप्रिल या कालावधीत बाणेर येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. याप्रकरणी तरुणाने गुरुवारी (दि.४) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ८१२७३२५८१० या मोबाईल क्रमांकावरून बोलणारा मनोज अग्रवाल, रवीचंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मनोज नावाच्या व्यक्तीने फोन करुन तुमचे पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकले असल्याचे सांगितले. त्यामध्ये ५ पासपोर्ट, ३ क्रेडीट कार्ड, ४ किलो कपडे, १ लॅपटॉप, २०० ग्रॅम एम.डी.एम.ए.ड्रग्स असल्याचे सांगितले. फिर्यादीला स्काईप ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फिर्यादीला व्हिडीओ कॉल करायला सांगितले. त्यानंतर त्यांचे लोकेशन ट्रेस केले व ते कुठे जातात, कोणाला बोलतात यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यातून सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली आहे.  हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMONEYपैसाfraudधोकेबाजी