शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा बिटकॉईनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी व्यावसायिक ठरताहेत टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:41 IST

व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़.

ठळक मुद्देहा सर्व पैसा बेकायदेशीर असल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा दावा

पुणे : व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. मात्र, हा सर्व पैसा बेहिशोबी असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मनोज ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे़. याबाबत ओसवाल यांनी सांगितले की, पुण्यातील एका आघाडीच्या व्यावसायिकाने आपल्याला बिटकॉईनच्या खरेदी व त्याची सत्यता पडताळणीसाठी बोलावले होते़. त्यांना एका विमान प्रवासात दिल्लीतील एक व्यक्ती भेटली व तिने त्यांना त्यांचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत समजावून सांगितली होती़. ही व्यक्ती मोठ्या मोठ्या कंपनीचे संचालक व व्यावसायिक यांना हेरुन आपल्याकडे बिटकॉईन असल्याची सांगतो़. त्यानंतर त्यांच्याकडील काळा पैसा यात रुपांतरीत करुन सुरक्षित ठेवता येईल़. त्यासाठी काही कमिशन द्यावे लागेल, असे सांगत असे़ पुण्यातील या व्यवसायिकालाही त्याने आपल्या खात्यात १ हजार कोटी रुपये असल्याचे दाखविले होते़. त्यांना ४० कोटी रुपये गुंतवणूक करुन देण्याचे आश्वासन दिले होते़. त्यानुसार त्यांनी पैसे ट्रान्सफरही केले होते़. पण, हा व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांचे पैसे वाचले आहेत़. परंतु, अशा प्रकारे अनेकांची छोट्या मोठ्या रक्कमेची फसवणूक झाली आहे़. परंतु, हा सर्व पैसा बेकायदेशीर असल्याने कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा दावा मनोज ओसवाल यांनी केला आहे़. लोकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले़. 

---

टॅग्स :Crimeगुन्हाBitcoinबिटकॉइनPoliceपोलिसbusinessव्यवसाय