शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तन्वीर सन्मान यंदा नसीरुद्दीन शाह यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:02 PM

यंदाचा तन्वीर सन्मान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे : रुपवेध प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा तन्वीर सन्मान पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर झाला आहे. दीपा लागू यांनी पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. तर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार यंदा पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक गोंविद निहलानी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. 

दरवर्षी 9 डिसेंबर राेजी रुपवेध प्रतिष्ठानच्या वतीने तन्वीर तन्वीर सन्मान आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार दिला जाताे. तन्वीर हा ज्येष्ठ अभिनेते डाॅ. श्रीराम लागू आणि दिपा लागू यांचा मुलगा. त्याचे एका अपघातात निधन झाले. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हा साेहळा आयाेजित केला जाताे. भारतीय रंगभूमिच्या प्रवागात अतिशय महत्त्वपूर्ण, भरीवकामगिरी केलेल्या रंगधर्मींना तन्वीर पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. आजची रंगभूमी ज्यांच्या खांद्यावर उभी आहे त्यांचा परिचय आजच्या पिढीला व्हावा असा ही एक उद्देश आहे. 

नसीरुद्दीन शाह यांच्या नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील याेगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. शाह नेहमीच चित्रपटांसाेबत रंगभूमिवर कार्यरत राहिले आहेत. इंग्रजी तसंच हिंदी, उर्दू भाषेतल्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर प्रत्येकवेळी नवा आणि कालसुसंगत आशय मांडला आहे. 

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाहPuneपुणे