शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शहरात टँकरचा काळाबाजार सुरू, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:17 IST

उन्हाळ्याच्या झळांमध्ये वाढ होऊ लागताच महापालिकेकडे पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महापालिकेने नागरिकांची गरज भागवण्यासाठी स्वत:च्या टँकरबरोबरच काही खासगी संस्थांबरोबरही पाणी पुरवण्यासाठी करार केला आहे; मात्र त्यांच्यावर दरांचे बंधन असतानाही ते जादा दराने टँकर विकत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

पुणे - उन्हाळ्याच्या झळांमध्ये वाढ होऊ लागताच महापालिकेकडे पाण्याच्या टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महापालिकेने नागरिकांची गरज भागवण्यासाठी स्वत:च्या टँकरबरोबरच काही खासगी संस्थांबरोबरही पाणी पुरवण्यासाठी करार केला आहे; मात्र त्यांच्यावर दरांचे बंधन असतानाही ते जादा दराने टँकर विकत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.शहराच्या मध्यभागात नसले, तरीही उपनगरांमध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी द्यावेलागते. त्यातही वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, धानोरी,टिंगरेनगर; तसेच धायरी, नºहे, आंबेगाव या भागात पाण्याची जास्त टंचाई आहे; तसेच हडपसरच्या काही भागातही टँकरची मागणी होऊ लागली आहे.सध्या सर्व मिळून ३००पेक्षा जास्त टँकर लागत आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या खासगी टँकरचालकांकडून नागरिकांची अडवणूक करून जास्त पैसे घेतले जात आहे. एका टँकरला ७०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत़टँकरमाफियांवर कारवाईची मागणी महापालिकेने काही वर्षांपूर्वी पाण्याच्या टँकरना जीपीएस यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला होता; तसेच खासगी टँकर्स व्यावसायिकांना त्यांनी जिथे टँकर दिला तेथील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आणणे बंधनकारक केले होते; मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे खासगी टँकरचालकांचे फावले आहे. बहुसंख्य टँकर पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातूनच टँकर भरून घेतात. तिथेही टँकरमाफिया तयार झाले असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे