Pune Election: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. पुण्यात तर भाजप, शिवसेना राष्ट्रवादी या पक्षांकडून उमेदवारी अर्ज देखील मागवले जात आहेत. या सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज भाजप कार्यालयात आले आहेत. भाजपकडून इच्छुकांचे आतापर्यंत जवळपास २५०० अर्ज आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे इतर पक्षातील काही इच्छुकांनीही भाजपकडे अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रक्रियेत एक नाव विशेष चर्चेत आले आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी भाजपच्या इच्छुकांच्या यादीत अर्ज केल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे.
पुण्यात आज भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या शहर कार्यालयाबाहेर जे.एस.पी.एम. संस्थेची एक गाडी आली. या गाडीत संस्थेतीलच काही कर्मचारी होते. गाडीतून उतरलेल्या या कर्मचाऱ्यांच्या हातात गिरीराज सावंत यांचा उमेदवारी अर्ज होता. काही वेळातच हा अर्ज भाजप कार्यालयात जमा करून ते कर्मचारी निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर गिरीराज सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, “शिवसेनाच आमचा पक्ष आहे. आमच्या घरात आमदार आहेत, त्यामुळे भाजपची उमेदवारी स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या चर्चांना निराधार असल्याचे म्हटले असले तरी, खात्रीलायक सूत्रांनुसार पुण्यातील प्रभाग क्रमांक ३८ मधून गिरीराज सावंत यांच्या नावाने भाजपकडे अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून, आगामी महापालिका निवडणुकीत संभाव्य राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Amidst Pune's municipal elections, Tanaji Sawant's son, Giriraj, is rumored to have applied for BJP candidacy from ward 38. Despite his denial and affiliation with Shiv Sena, sources confirm the application, igniting political discussions.
Web Summary : पुणे नगर निगम चुनावों के बीच, तानाजी सावंत के बेटे, गिरिराज के वार्ड 38 से भाजपा उम्मीदवारी के लिए आवेदन करने की अफवाह है। इनकार के बावजूद, सूत्रों ने आवेदन की पुष्टि की, जिससे राजनीतिक चर्चा शुरू हो गई।