भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ प्रथम

By Admin | Updated: August 14, 2015 03:24 IST2015-08-14T03:24:00+5:302015-08-14T03:24:00+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेत भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मंडळाच्या

Talim Mitra Mandal First of the Bhosari Leung Lime Talim | भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ प्रथम

भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ प्रथम

पिंपरी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेत भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मंडळाच्या ‘वृद्धाश्रम’ या सामाजिक देखाव्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. प्राधिकरण, निगडीतील जयहिंद तरुण मंडळाच्या ‘निसर्गाने घातला घाव, कालीमाते धाव धाव’ या सामाजिक देखाव्यास द्वितीय आणि चिंचवडच्या अखिल मंडई मित्र मंडळाच्या ‘तुळजाभवानी मातेचा साक्षात्कार’ या देखाव्यास तिसरा क्रमांक मिळाला.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी निगडी येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष सुनील रासने, सचिव माणिकराव चव्हाण, खजिनदार महेश सूर्यवंशी, उपमहापौर प्रभाकर वाघेरे आदी उपस्थित होते. स्पर्धेत शहरातील १४७ मंडळांपैकी ७० मंडळांना एकूण ८ लाख ४९ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. परीक्षक म्हणून दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सूर्यवंशी, रामदास चिंचवडे, अनिल वाघेरे यांनी, तर संयोजक म्हणून विलास कामठे, बापूसाहेब ढमाले, राजाभाऊ गोलांडे यांनी काम पाहिले. यंदाच्या वर्षी गोलांडे हे परीक्षण मंडळाचे प्रमुख असणार आहेत. बक्षीस वितरण सोहळा येत्या बुधवारी (दि. १९) सायंकाळी सहाला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.
स्पर्धेत भोसरीच्या आझाद मंडळाने (देखावा : विठ्ठल विठ्ठल) चौथा आणि चिखलीच्या जय बजरंग मंडळाने (गड आला पण सिंह गेला) पाचवा क्रमांक मिळविला. प्रत्येक प्रभागानुसार ५ मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच जिवंत देखावा, रौप्य महोत्सवी मंडळ, विद्युत रोषणाई, हौसिंग सोसायटी अशा गटातही बक्षिसे आहेत.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : (प्रथम पाच मंडळे) : ‘अ’ प्रभाग : जय बजरंग मंडळ, निगडी गावठाण (दत्तात्रय जन्मसोहळा), श्रीकृष्ण क्रांती मंडळ, आकुर्डी (संस्कृती व विकृती), तुळजामाता मंडळ, आकुर्डी (लंकादहण), शरयुनगर प्रतिष्ठान, निगडी (साईलीला), हनुमान मंडळ (माळीण दुर्घटना).
‘ब’ प्रभाग : अष्टविनायक मंडळ, चिंचवड (गणेशजन्म सोहळा), एसकेएफ मंडळ, चिंचवड (न्याय शिवशाहीचा, न्याय लोकशाहीचा), हनुमान मंडळ, चिंचवडगाव (अंधश्रद्धा निर्मूलन), उत्कृष्ट मंडळ, चिंचवडगाव (साईलीला), गांधी पेठ तालीम मंडळ, चिंचवडगाव (तुकारामाचे सदेह वैकुंठगमन).
‘क’ प्रभाग : पठारे लांडगे मंडळ, भोसरी (माता वैष्णवीदेवी महिमा), समता मंडळ, भोसरी (गोवर्धन पर्वत- एकी हेच बळ), स्वराज्य मंडळ, संत तुकारामनगर (गड-किल्ले संवर्धन व जतन), समस्त गव्हाणे तालीम मंडळ, भोसरी (रेड्यामुखी वेद), दामुशेठ गव्हाणे मंडळ, भोसरी (संत गोरा कुंभार).
‘ड’ प्रभाग : छत्रपती शिवाजी मंडळ, पिंपळे गुरव (श्रीकृष्णाची रासलीला), अमरदीप मंडळ, पिंपरीगाव (थांबवा आता हे), शिवराजे प्रतिष्ठान, पिंपरीगाव (बालाजीचा अवतार), डी वॉर्ड फ्रेंड्स सर्कल, पिंपरी (साडेतीन शक्तिपीठे), अनंतनगर मंडळ, पिंपळे गुरव (कालियामर्दन).
जिवंत देखावा गट : राष्ट्रतेज मंडळ, काळभोरनगर (धर्मवीर संभाजीराजे), भगवान गव्हाणे मंडळ, भोसरी (स्वप्न सुजलाम सुफलाम भारताचे), आनंदनगर मंडळ, सांगवी (प्रतापगडाचा गनिमी कावा), नरवीर तानाजी मंडळ, दिघी रोड (प्रभाव सोशल मीडियाचा), सम्राट मंडळ , थेरगाव (देवा तुला शोधू कुठे?).
रौप्य महोत्सवी वर्षे मंडळ गट : माळी आळी मंडळ, भोसरी (तृणासुर राक्षसाचा वध), गणराज मंडळ, भोसरी (नरसिंह अवतार), राष्ट्रतेज मंडळ, नेहरुनगर (गणेश दरबार), सिद्धिविनायक प्रतिष्ठान, संत तुकारामनगर (शिव महल), जय महाराष्ट्र मंडळ (मुक्या प्राण्यांवर दया करा).
हौसिंग सोसायटी : सुखवानी एन्क्लेव्ह सोसायटी, पिंपरी, गजराज सोसायटी, सांगवी, गुरुस्मृती सोसायटी, रावेत, जीवन उपवन सोसायटी, रावेत, मेघमल्हार
सोसायटी, भोसरी.
उल्लेखनीय देखावे : मित्र सहकार्य मंडळ, पिंपरी (शिवकालीन शासनपद्धती), भोजेश्वर मंडळ, भोसरी (महागाईचा टॅक्सचा बोजा), शिवछत्रपती मंडळ, किवळे (सत्यवान सावित्री), मोरया कॉलनी तिरंगा मंडळ, मोरया कॉलनी (काचेचा शिशमहल), साईराज मंडळ, चिंचवड (परस्त्री मातेसमान), जोतिबा कामगार कल्याण मंडळ, काळेवाडी (गंगावतरण), खंडेराज काळभोर ट्रस्ट, काळभोरनगर (महाराष्ट्राची लोकधारा), स्वराज्य प्रतिष्ठान, पिंपरी (जेजुरी मंदिर).
(प्रतिनिधी)

Web Title: Talim Mitra Mandal First of the Bhosari Leung Lime Talim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.