तळेगावमध्ये ट्रक घुसला इमारतीत

By Admin | Updated: June 30, 2015 00:29 IST2015-06-30T00:29:35+5:302015-06-30T00:29:35+5:30

तळेगाव-चाकण मार्गावरील फलकेवाडी येथील सक्सेस चेंबर्स या इमारतीत मालाने भरलेला ट्रक घुसला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

In Talegaon a truck rammed into the building | तळेगावमध्ये ट्रक घुसला इमारतीत

तळेगावमध्ये ट्रक घुसला इमारतीत

तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण मार्गावरील फलकेवाडी येथील सक्सेस चेंबर्स या इमारतीत मालाने भरलेला ट्रक घुसला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मोठी दुर्घटना टळली असली, तरी या मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुंबईहून चाकणकडे निघालेला ट्रक तळेगावातील ईगल कंपनीच्या उतारावरून सेवाधाम रुग्णालयाच्या वळणावर आला असता अचानक घसरला. वेग कमी करण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक दाबला असता ट्रक थेट सक्सेस चेंबर्सच्या आवारात घुसला. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना अपघाताची खबर कळविताच हवालदार प्रकाश
वाघमारे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साह्याने ट्रक सुमारे तासाभरानंतर रस्त्यावर काढण्यात यश आले.
सतत होणारे अपघात पाहता पीडब्ल्यूडीने उपाययोजना करण्याची मागणी सुरेश चौधरी, दिलीप
राजगुरव, धनंजय देशमुख, किरण ओसवाल आणि पालकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: In Talegaon a truck rammed into the building