शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्डच्या त्रुटीचा फायदा घेत घातला ७ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 16:06 IST

पेट्रोलपंपावरील कामगाराने एटीएम कार्डमधील त्रुटीचा वापर करुन तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : पेट्रोलपंपावरील कामगाराने एटीएम कार्डमधील त्रुटीचा वापर करुन तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.हा प्रकार हडपसर येथील टेकवडे पेट्रोल पंपावर ११ फेब्रुवारी २०१८ ते १३ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला. हडपसर पोलिसांनी बँकेच्या खातेधारकावर गुन्हा दाखल केला होता.मात्र, हा प्रकार पेट्रोलपंपावरील कामगारानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी अजिंक्य टेकवडे (वय २८, रा़ आकाशवाणी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, टेकवडे यांचा आकाशवाणी समोर पेट्रोलपंप आहे़ त्यांच्याकडे स्वाईप कार्ड मशीन आहे. वाहनचालकाने पेट्रोल भरल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकाने अकाऊंट नंबरचे एटीएम कार्डचा वापर केला. पेट्रोल पंपावर असलेल्या बँकेचे स्वाईप कार्ड मशीनवर स्वाईप केल्यानंतर त्याची मशिन मधून पहिली स्लिप काढल्यानंतर मशिनवरील व्हाईट बटन दाबून तो केलेला व्यवहार रद्द करीत असे. पहिली स्लिप वाहनचालकाला देत असे.त्यामुळे वाहनचालकाला त्याची माहिती मिळत नसत नसे. हा प्रकार तब्बल एक वर्ष सुरु होता. तो लक्षात आल्यावर एक खातेदार फसवणूक करीत असल्याचे उघड झाले.

हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासात बँकेचा खातेदाराने व पेट्रोल पंपावरील एक कामगार हे मित्र आहेत़. खातेदार याचा हॉटेल व्यवसाय असून त्याच्याकडे २ एटीएम कार्ड होते. मित्राच्या मागण्यावरुन त्याने त्याच्याकडील एक कार्ड कामगाराला दिले. त्याने या कार्डाच्या सहाय्याने फसवणूक करीत आहे.

असा करता होता फसवणूकपेट्रोल पंपावर आलेल्या एखाद्या वाहनचालकाला मला एटीएममध्ये जायला वेळ नाही़ वाहनचालकाने वाहनात पेट्रोल भरल्यानंतर त्यांना सांगायला ते पैसे मी माझ्या कार्डवरुन भरतो, तुम्ही रोख पैसे द्या़ व तो कार्डद्वारे पैसे भरल्याची पहिली पावती बाहेर आल्याबरोबर पांढरे बटण दाबून व्यवहार रद्द करायचा़ आलेली पहिली पावती तो ग्राहकाला द्यायचा़ त्यांनाही पैसे भरल्याचे वाटून ते त्याला रोख पैसे द्यायचे, अशा प्रकारे त्याने वर्षभरात तब्बल ७ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे़ सहायक पोलीस निरीक्षक एस डी़ चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीatmएटीएमPuneपुणे