शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर मावस बहिणीचा विनयभंग; पिंपरीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 16:18 IST

बलात्कार करुन मुलींना रात्रभर स्टेशन परिसरात बसवले.

ठळक मुद्देपिंपरीतील खळबळजनक घटना; पाच युवकांना अटक 

पिंपरी : ओळखीचा फायदा घेत एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तर, सोबत असलेल्या मित्राने मावस बहिणीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना अजंठानगर येथे घडली. त्यानंतर आरोपींनी तिघा मित्रांना बोलावून पीडित मुलींना चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी (दि. १५) रात्रभर बसविल्याचे समोर आले आहे.

करण भैरवनाथ साबळे (वय २१, रा. तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर चिंचवड), आशिष आनंद सरोदे (वय २०, रा. पत्राशेड, पीसीएमसी शाळेजवळ, अजंठानगर), निवास संजय सुतार (वय २०, रा. सी. पत्राशेड, अजंठानगर), तेजस राजू वाघमारे (वय १९, रा. तिरंगा हाऊसिंग सोसायटी, अजंठानगर), कार्तिक उर्फ टिंक्या राजकुमार चव्हाण (वय २१, रा. डी. पत्राशेड, अजंठानगर) यांना निगडी पोलिसांनीबलात्काराच्या आरोपावरुन अटक केली. न्यायालयाने त्यांना २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिडित अल्पवयीन मुलींनी फिर्याद दिली आहे.

पीडित मुली मंगळवारी रात्री (दि. १५) नातेवाईकाकडे जेवणासाठी गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतत असताना त्यांना ओळखीचे करण आणि आशिष भेटले. त्यांनी जवळच भटकंती करु असे सांगून अजंठानगर मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे आशिषने एका मुलीवर बलात्कार केला. तर, करणने तिच्या मावस बहिणीचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. पीडित मुलींना मोटारकारमध्ये बसवून चिंचवड स्टेशन परिसरात रात्रभर बसविले. बुधवारी सकाळी पीडित मुलींना सोडल्यानंतर ही घटना उजेडात आली.

याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ म्हणाले, आरोपींची पीडितेशी ओळख होती. त्याचा फायदा घेत आशिषने एका मुलीवर बलात्कार केला. तर, करणने दुसऱ्या मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर सर्व आरोपींनी पीडितेला रात्रभर चिंचवड स्टेशन परिसरात थांबवून ठेवत सकाळी सोडून दिले. सामुहिक बलात्कार झाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दोनही मुलींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरु आहे. त्यातून नेमकी माहिती हाती येईल. तसेच, आरोपींवर या पुर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक