शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या टाकेवाडीने पटकावला वाॅटर कप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 21:25 IST

सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित हाेते.

पुणे : अामिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव वाॅटर कप स्पर्धेत यंदाच्या वर्षी साताऱ्यातील टाकेवाडी या गावाने प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पारिताेषिकाचे वितरण करण्यात अाले. बालेवाडी येथील क्रीडासंकुलात हा पारिताेषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विराेधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील,  जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्‍यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, अमृता फडणवीस अादी उपस्थित हाेते.

     प्रथम क्रमांक मिळालेल्या टाकेवाडी या गावाला वाॅटर कप ट्राॅफी अाणि 75 हजार रुपयांचा धनादेश देण्यात अाला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सातारच्या भांडवली अाणि बुलडाणाच्या सिंदखेडा या गावांना विभागून देण्यात अाला. 25 लाख रुपये प्रत्येकी अाणि सन्मानचिन्ह असे पारिताेषिक या गावांना देण्यात अाले. तर तृतीय क्रमांक बीडच्या आनंदवाडी अाणि नागपूरच्या उमठा या गावांना विभागून देण्यात अाला या गावांना 20 लाख रुपये अाणि सन्मानचिन्ह देण्यात अाले. तर राज्य सरकारकडून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावाला 25 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गावांना 15 लाख रुपये तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या गावांना 10 लाखांचे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

    यावेळी बाेलताना अामिर खान म्हणाले, पानी फाऊंडेशन हे महाराष्‍ट्रातील जनतेने बघितलेले  स्‍वप्‍न आहे. महाराष्‍ट्राला समृध्‍द, पाणीदार बनविण्‍याचे हे स्‍वप्‍न आहे. हे स्‍वप्‍न साकार करण्‍याचे काम केवळ सरकार, कोणतीही सेवाभावी संस्‍थेचे नाही तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून करण्याचे काम अाहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्‍यास ते साकार होणार आहे. स्‍वप्‍नपूर्तीची ही तर सुरूवात आहे. कोणत्‍याही गोष्‍टीची पूर्ती आपल्‍या हातात नसते मात्र ती गोष्‍ट पूर्ण करण्‍यासाठी लागणारा प्रवास आपल्‍या हातात असतो, तो अत्‍यंत प्रामाणिकपणे करण्‍याची आवश्‍यकता आहे. एक दिवस नक्‍कीच महाराष्‍ट्राचे स्‍वप्‍न पुर्ण होईल.

टॅग्स :PuneपुणेWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाAamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसर