शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटकाळात दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना प्राधान्याने सेवेत घ्या : डॉ.अविनाश भोंडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 15:24 IST

आम्ही सरकारला सर्वप्रकारचे सहकार्य करायला तयार आहोत.

ठळक मुद्देआयुर्वेद व होमिओपॅथिक डॉक्टरही काम करण्यास तयार

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या सदस्यांची कोविडसाठी सरकारच्या सेवेत जाण्याची तयारी आहे. आताही अनेक डॉक्टर शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. पण सध्या आपले नर्सिंग होम, क्लिनिकमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांऐवजी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचा त्यासाठी प्राधान्याने विचार करायला हवा. तसेच आयुर्वेद व होमिओपॅथिक डॉक्टरही काम करण्यास तयार आहेत, त्यांनाही सेवेत संधी द्यावी, असे ‘आयएमए ’महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले.राज्य शासनाने दवाखाने बंद न ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून सरसकट सर्वांनाच नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच सध्या गरजेनुसार खासगी डॉक्टरांना सरकारी सेवेत घेतले जात आहे. यापार्श्वभूमीवर बोलताना डॉ. भोंडवे म्हणाले, आयएमएचे सदस्य असलेल्या बहुतेकांचे दवाखाने उघडे आहेत. पण परिचारिका व इतर कर्मचाºयांअभावी हे दवाखाने पुर्ण क्षमतेने चालविता येत नाहीत. शासनाने ५५ वषार्पुढील डॉक्टर तसेच गर्भवती किंवा एक वर्षांपेक्षा लहान बाळ असलेल्या महिला डॉक्टरांना यातून वगळले आहे. सेवा देताना बाधा झाली तर ५० लाखांचा विमा, मानधन या बाबीही मान्य केल्या आहेत. तसेच स्वत:चे दवाखाने बंद ठेवणारे डॉक्टर आणि आयुर्वेद, होमिओपॅथिक डॉक्टरांना सेवेत घ्यायला हवे. सध्या सेवा देत असलेल्या डॉक्टरांनाच शासकीय सेवेत घेतल्यास दवाखाने बंद पडतील. तज्ञ डॉक्टरांना सेवा देता येणार नाहीत. याचा विचार करण्याची गरज आहे.पुणे शहरातील अनेक दवाखाने सध्या विविध कारणांमुळे बंद आहेत. अनेकांनी कर्मचारी नसल्याने बंद ठेवले आहेत. तर काहींनी भीतीपोटी बंद केले आहेत. याबाबत प्रशासन सर्वेक्षण करून त्यांचा शोध घ्यायला हवा. दवाखाने सुरू असलेल्यांनाच नोटीस पाठविली जात आहे. आम्ही सरकारला सर्वप्रकारचे सहकार्य करायला तयार आहोत, असे डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले.------------

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेhospitalहॉस्पिटल