स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत : चौधरी
By Admin | Updated: March 29, 2017 00:06 IST2017-03-29T00:06:13+5:302017-03-29T00:06:13+5:30
लहान मुला-मुलींनी लहानपणापासूनच स्वरक्षण कसे करावे, हे कराटेच्या माध्यमातून शिकावे आणि या खेळात

स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत : चौधरी
उरुळी कांचन : लहान मुला-मुलींनी लहानपणापासूनच स्वरक्षण कसे करावे, हे कराटेच्या माध्यमातून शिकावे आणि या खेळात प्रावीण्य मिळवून आपल्या गावाचे नाव रोशन करावे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाचे सरचिटणीस पूनम सागर चौधरी यांनी येथे केले. त्या ‘कोटका हा शितोरिया कराटे चॅम्पियनशिप २०१७’चे उद्घाटन करताना बोलत होत्या.
हवेली तालुका कराटे असोसिएशन व इंटरनॅशनल कराटे फेडरेशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ४ थी महाराष्ट्र-राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन कुंजीरवाडी येथे २६ मार्च रोजी करण्यात आले होते.
कुंजीरवाडीचे माजी उपसरपंच सुरेश अंनता कुंजीर अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उरुळी कांचनचे उपसरपंच सुनील कांचन, ‘यशवंत’चे माजी संचालक मिलापचंद गायकवाड, मच्छिंद्र कोतवाल, मिलिंद कुंजीर, भरत निगडे, संतोष कुंजीर, मनोज काळभोर, राहुल काळभोर, स्वप्निल काळभोर, पपू वलटे, आदित्य कुंजीर, गणेश सावंत, पै. महेश काळभोर, नाथाशेठ कुंजीर, अमर पांगारकर, विजय चौधरी, बाबा भिसे, दत्तात्रय झेंडे, बजरंग काळभोर, भानुदास जेधे, अजिंक्य चौधरी, सुवर्णा कुंजीर, नवनाथ कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रज्वल रामदास कुंजीर आणि नागेश काळभोर यांनी केले होते. सुनील कांचन यांनीही भाषणात मुलगा आणि मुलगी यांनी बरोबरीने समाजात नाव कमवावे आणि कराटेच्या माध्यमातून समाजातील वाईट घटकांपासून स्वत:चे रक्षण कसे करायचे हे शिकावे, असे मत मांडले. आदेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे हवेली तालुका विभागप्रमुख स्वप्निल कुंजीर यांनी आभार मानले. (वार्ताहर)