शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे प्रश्न जाहीरनाम्यात घ्या ; तरुणाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 19:49 IST

तरुणांचे प्रश्न राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात घ्यावेत अशी मागणी तरुणाईने केली असून त्यासाठी विविध 12 मुद्देही विविध राजकीय पक्षांना पाठविण्यात आले आहेत.

पुणे :  तरुणांचे प्रश्न राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात घ्यावेत अशी मागणी तरुणाईने केली असून त्यासाठी विविध 12 मुद्देही विविध राजकीय पक्षांना पाठविण्यात आले आहेत. त्याचबराेबर तरुण राजकीय नेत्यांशी तरुणाई संवाद साधणार असून युवकांच्या संकल्पनेतील युवा जाहीरनामा असा कार्यक्रम 14 मार्चला पुण्यात हाेणार आहे. 

भारत हा तरुण देश असल्याचे म्हंटले जाते. भारतात तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे. ही संख्या येत्या काळात आणखी वाढणार आहे. आज तरुणांसमाेर शिक्षणापासून ते नाेकरीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष आपले जाहीरनामे तयार करतात. त्यात अनेकदा तरुणांच्या प्रश्नांचा समावेश फार कमी असताे. तरुणांचा देश असताना राजकारणी तरुणांच्या प्रश्नाबाबत तितकेसे गंभीर नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यात तरुणांच्या प्रश्नांचा सहभाग करावा अशी मागणी पुण्यातील स्टुटंड हेल्पिंग हॅण्ड या संस्थेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध 12 मुद्दांशी तरुण सहमत असल्याची स्वाक्षरी माेहीम देखील घेण्यात आली हाेती. पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये ही माेहीम घेण्यात आली. 14 मार्च राेजी हाेणाऱ्या कार्यक्रमात युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष रविकांत वरपे, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसनेचे खासदार श्रीकांत शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, धनगर समाजाचे नेते गाेपीचंद पडळकर सहभागी हाेणार आहेत. 

तरुणांच्या 12 मुद्द्यांवर बाेलताना स्टुडंट हेल्पिंग हॅण्डची  संध्या साेनवणे म्हणाली, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात अनेकदा युवकांच्या प्रश्नांचा विचार केला जात नाही. तसेच ताे तयार करताना तरुणांना सहभागी करुन घेतले जात नाही. त्यामुळे त्यांचा अंतर्भाव या जाहीरनाम्यांमध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी संबंधित 12 मुद्दे काढले असून त्याचा अंतर्भाव राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणStudentविद्यार्थीPuneपुणे