संभाजीमहाराजांच्या पुतळ्याबाबत बैठक घ्या

By Admin | Updated: May 22, 2017 06:45 IST2017-05-22T06:45:17+5:302017-05-22T06:45:17+5:30

जंगलीमहाराज रस्त्यावरील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात संभाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी महापालिका

Take a meeting with Sambhaji Maharaj statue | संभाजीमहाराजांच्या पुतळ्याबाबत बैठक घ्या

संभाजीमहाराजांच्या पुतळ्याबाबत बैठक घ्या

पुणे : जंगलीमहाराज रस्त्यावरील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात संभाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीमहाराज स्मारक समितीने महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन हा पुतळा बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत बैठक घेण्याचे पत्र आयुक्तांनी महापौरांना पाठविले आहे.
आयुक्तांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रानुसार, उद्यानात पुतळा बसविण्यासाठी छत्रपती संभाजीमहाराज स्मारक समितीची आग्रही मागणी असून त्याबाबतचे निवेदनही समितीकडून देण्यात आले आहे. त्यास आयुक्तांनीही सकारात्मक भूमिका घेतली असून, या विषयांवर संबधितांसमवेत सर्वसमावेशक चर्चा होणे अपेक्षित असून याबाबत आपल्या स्तरावर संयुक्त बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत महापौरांकडून लवकरच बैठक घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुतळा बसविण्याचा निर्णय होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

Web Title: Take a meeting with Sambhaji Maharaj statue