नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधीचा वेध घ्या : डॉ. रघुनाथ माशेलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 13:19 IST2018-01-20T13:17:00+5:302018-01-20T13:19:56+5:30
नव्या तंत्रज्ञानामुळे ५५ नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधीचा वेध घ्या : डॉ. रघुनाथ माशेलकर
पुणे : तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ५५ नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ३-डी प्रिंटिंग, रोबोटीक प्रोसेस आटोमोशन, रिटेल डाटा अनालिस्ट, इंटरनेट, मोबाईल आदींमधील नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११२व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, अधिष्ठाता विजय खरे, व्ही. बी. गायकवाड, प्रा. प्रफुल्ल पवार, दीपक माने उपस्थित होते.
डॉ. माशेलकर पुढे म्हणाले, की भारत संशोधनामध्ये वेगाने प्रगती करतो आहे. देशभरात ११६५ संशोधन संस्था आणि ९२८ आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून ३ लाख २३ हजार संशोधक व शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. शिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश केला आहे. अनिश्चिता आणि गुंतागुंतीच्या नव्या जगात आपण प्रवेश केला आहे. मात्र विद्याथ्यार्नी त्याला घाबरून जाऊ नये असे आवाहन माशेलकर यांनी केले.
डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा यावेळी मांडला.