पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या अखेरीस टर्मिनस निर्माण करण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या जागेच्या बदल्यात महापालिकेला आता वाघोली ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याबरोबरच जुन्या बिलांचा पुनर्विचारही करावा लागणार आहे. ग्रामस्थांबरोबर लवकरच पालिकेची बैठक होणार असून, त्यात याबाबत अंतिम निर्णय होईल. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी केली आहे.वाघोली येथील बीआरटी मार्गाच्या अखेरीस असणारी सुमारे दोन एकर जागा निश्चित करण्यात आली; मात्र ही जागा घेत असाल, तर मग वाघोलीसाठी तुम्हाला काही करावे लागेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावर काहीच निर्णय होत नसल्याने बीआरटी मार्ग तयार असूनही त्यावर वाहने सुरू करणे अवघड झाले होते.
आमच्याकडून घेता, मग आम्हालाही द्या!
By admin | Updated: January 8, 2016 01:46 IST