शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बैठका बास झाल्या, आता निर्णय घ्या; भाटघर धरणग्रस्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:19 IST

: स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पदरी निराशाच, मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन

भोर : तालुक्यातील भाटघर धरणाला ९१ वर्षे झाली, तर स्वातंत्र्य मिळूनही ७१ वर्षे झाली. मागील अनेक वर्षांपासून वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्यात आली; मात्र भाटघर धरणग्रस्तांच्या पदरी आश्वासना शिवाय ठोस असे काहीच पडलेले नाही. वारंवार बैठका होतात; मात्र पदरी निराशाच पडत असल्याने आता बास झाल्या बैठका, निर्णय घ्या; अन्यथा धरणग्रस्तच पुढचा निर्णय घेतील, असा इशारा संतप्त भाटघर धरणग्रस्तांनी दिला आहे.

भाटघर धरणग्रस्थांच्या विविध मागण्यांबाबत मंगळवारी मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन येत्या १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन या बैठकीत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले. यामुळे धरणग्रस्तांनी आक्रम पावित्रा घेत निर्णय घेण्याची मागणी केली; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

१९२७ मध्ये ब्रिटिशांनी बळाच्या जोरावर वेळवंडी नदीवर भाटघर धरण बांधले. यात ४० गावांतील शेतीच्या ५६७० एकर जमिनी पाण्यात गेल्या तेव्हापासून येथील शेतकरी उत्पन्नाचे साधन पाण्यात गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले.

जमिनीचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन, साखळी उपोषण, जलसमाधी अशा विविध मार्गांनी आंदोलने सुरु आहेत. त्या वेळी धरणग्रस्तांना तात्पुरती आश्वासने देऊन वेळ मारुन नेली जाते, मात्र धरण भागातील ४० गावांत नागरी सुविधा वगळता कोणतेच ठोस काम झालेले नाही. धरणात गेलेल्या जमिनीला मोबदला मिळावा म्हणून झगडता झगडता एक पिढी मातीआड गेली. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. तसेच शासनाला जागही आली नाही.

धरणाच्या पाण्यामुळे बारामती, फलटण, माळशिरस, पंढरपूरपर्यंत लाखो एकर शेती ओलिताखाली आली. याबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. तर शासनालाही लाखो रुपयांचा महसूल मिळतो. वीर आणि भाटघर धरणे एकाच कालावधीतील असून, वीर धरणग्रतांना पुनर्वसनाचा लाभ मिळतो. मात्र, मागील ९१ वर्षांत भाटघर धरणग्रस्तांनी प्रयत्न करुनही शासनाकडून कोणताच लाभ मिळालेला नाही.

त्यामुळे ९ आॅक्टोबरला वाकांबे गावात साखळी उपोषण व जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र मंगळवारी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यातआले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणे