शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हात तुमच्या नेत्याचा प्रचार करताना ‘ही घ्या काळजी !’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 03:16 IST

याबाबत डॉ़ अविनाश भोंडवे यांनी सांगितले, की दिवसा कोणत्याही वेळी घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी अथवा छत्रीबरोबर ठेवावी़

विवेक भुसे 

पुणे : सार्वत्रिक निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा होऊन आता सर्वांचा प्रचारही सुरू झाला आहे़ मतदानाला अत्यंत कमी दिवस राहिले असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार मॉर्निंग वॉकपासून रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहे़ त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्तेही मागोमाग धावताना दिसतात़ राज्यात उन्हाचा पारा ४० च्या पार गेला आहे़ विदर्भात तर त्याने ४३ चा आकडा गाठला आहे़ त्यामुळे अशा रणरणत्या उन्हात प्रचार करायचा तर नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे़ या उमेदवारांबरोबर आता त्यांच्या सौभाग्यवतीही चार भिंतीतून बाहेर पडून प्रचारात हिरीरीने भाग घेत असतात़ त्यांच्यासाठी तर ही आणखीच कठीण वेळ असते़

याबाबत डॉ़ अविनाश भोंडवे यांनी सांगितले, की दिवसा कोणत्याही वेळी घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी अथवा छत्रीबरोबर ठेवावी़ महिला डोक्यावर पदर घेत असतात, पण पुरुष काळजी घेत नाही़ त्यांनी टोपी अवश्य वापरावी़ माणसाने दिवसभरात किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते़ उन्हाळ्यात तर अधिक पाण्याची गरज असते़ केवळ पाणीच नाही तर आपल्या शरीराला क्षाराचीही गरज असते़ त्यामुळे पाण्याबरोबरच ताक, कोकम, पन्हे, लिंबूसरबत पिणे श्रेयस्कर ठरेल़ अशा वेळी किती पाणी प्यावे, असा सर्वांनाच प्रश्न पडतो़ या उन्हात तासाला एक ग्लास पाणी शरीरात गेले पाहिजे़ त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या हे प्रमाण ठरविण्यासाठी उपयुक्त आहे़ एक लिटरच्या किमान तीन बाटल्या पाणी पिले पाहिजे़घराबाहेर पडताना सैल, पांढरे कपडे घालावेत़ शक्य असेल तर गॉगल आवश्यक वापरावा़ लोकांना काय वाटेल, यापेक्षा डोळ्यांची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे़ अशा कडक उन्हात सतत फिरल्यास मोतीबिंदूसारखा आजार होण्याची शक्यता असते़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक स्वच्छता़ सकाळी अंघोळ केल्यानंतर दिवसभर उन्हात फिरताना घाम खूप येतो़ त्यातून घामोळ्या येण्याचा त्रास अनेकांना होतो़ त्यासाठी आपल्या अवघड जागी टाल्कम पावडरचा वापर नियमित करावा़ घाम आल्याने आपल्या शरीरातील घ्राणेंद्रिय बंद होतात़ घरी आल्यानंतर कोरड्या फडक्याने संपूर्ण अंग पुसून घ्यावे़प्रचार करताना वाटेत मिळेल ते आणि मिळेल तेथे खाण्याची कार्यकर्त्यांची सवय असते़ ही अनेकदा घातक ठरू शकते़ त्यातून शेवटच्या महत्त्वाच्या दिवसात आजारी पडण्याची शक्यता वाढते़ पूर्वी भेळभत्ता दिला जात असे़ चुरमुरे हे हलके असल्याचे पचायला सोपे असत़ आता वडापाव दिला जातो़ असे तेलकट पदार्थ रोज खाल्ल्याने उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार उद्भवू शकतात़ टायफॉइडही होऊ शकतो़ त्यामुळे स्वच्छ आणि शक्यतो घराचे जेवण घ्यावे़ फार तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नये़किती गार पाणी प्यावे?च्उन्हातून आल्यानंतर तहान लागल्याने अनेक जण घटाघटा थंडगार पाणी पिताना दिसतात़ खूप अतिथंड पाणी पिणे टाळावे़ तसेच उन्हातून आल्यानंतर अंगातील घामाचा निचरा होईपर्यंत थांबावे व त्यानंतर थोडे गार पाणी प्यावे़च्अतिथंड पाणी पिल्याने आपली तहान भागतेच असे नाही़ शिवाय त्यामुळे घसा दुखण्याचा त्रास होऊ शकतो़ त्यामुळे खूप गार पाणी पिण्याचे टाळावे़च्अशी काही पथ्ये पाळल्यास उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊन अधिक चांगला प्रचार करू शकतील, असे डॉ़ भोंडवे यांनी सांगितले़च् दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्यावेच्अतिथंड पाणी पिऊ नये़ पाण्याबरोबरच ताक, लस्सी, कोकम पिणे श्रेयस्करच् सैल व पांढरे कपडे वापरावेत़च्गॉगल अवश्य वापरावाच्पचायला व हलके अन्न घ्यावे़च्बाहेरचे तेलकट, अस्वच्छ अन्न टाळावे़ त्याऐवजी घरच्या जेवणाला प्राधान्य द्यावे़

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे