शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गणेशोत्सवात सांभाळा तुमच्या जीवश्च कंठश्च सख्याला! ६ दिवसात तब्बल ९२७ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:53 IST

मोबाइलच्या ११ आकडी आयएमईआय नंबरचा वापर करून शोध घेतला जातो

पुणे : मोबाइल हा आता केवळ वस्तू राहिलेला नाही. त्यामध्ये आपल्या सर्व आठवणी, महत्त्वाचे नंबर, अनेक सुखदु:खाचे प्रसंग चित्रित केलेले व्हिडीओ जीवापाड जपलेले असतात. त्यामुळे मोबाइल हा आता सर्वांचा सख्या, मित्र-मैत्रिणीपेक्षा अधिक झाला आहे. जीवनाचे सर्व अंग व्यापून राहिलेला हा मोबाइल चोरीला गेला तर? पुणे पोलिसांच्या "लॉस्ट अँड फाउंड" या ऑनलाइन पोर्टलवर गणेशोत्सवादरम्यान (दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२३) ९२७ मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सर्वाधिक मोबाइल चोरी विसर्जन मिरवणुकीत होते. त्यात ही बेलबाग चौक ते मंडई या परिसरात जेव्हा महत्त्वाचे गणपती मिरवणुकीत सहभागी होतात, तेव्हा या घटना अधिक होतात. तेव्हा देखावे पाहताना तसेच मिरवणुकीत आपला मोबाइल याकडे लक्ष द्या, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल चोरी किती, सापडले किती?

गणेशोत्सव सुरू होऊन ६ दिवस झाले आहेत. यादरम्यान पुणे पोलिसांच्या 'लॉस्ट ॲन्ड फाउंड'वर ९२७ तक्रारी आल्या असून, फक्त २५ मोबाइल रिकव्हर झालेले आहेत. गेल्या आठ महिन्यात तब्बल २५ हजार ५५७ मोबाइल चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ७६१ मोबाइल रिकव्हर करण्यात पाेलिसांना यश आले आहे.

शोध कसा लागतो?

पोलिसांचे तांत्रिक विश्लेषण करणारे पथक असते. मोबाइलच्या ११ आकडी आयएमईआय नंबरचा वापर करून मोबाइलचे लोकेशन मिळवले जाते. त्यानुसार मोबाइल तज्ज्ञ हरवलेल्या मोबाइलचा मागोवा घेतात.

मोबाइल चोरीला गेला तर हे कर...

https://admin.punepolice.gov.in/LostFoundReg या पोर्टलवर जा.

- तेथे दिलेला सर्व तपशील व्यवस्थित भरा.

- त्यानंतर कॅप्चा टाकून "सबमिट" या बटणावर क्लिक करा.

- नॅशनल वेबसाइट https://ceir.gov.in यावरही तक्रार करता येते.

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवMobileमोबाइलThiefचोरPoliceपोलिस