शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या अन् भरपूर पाणी प्या! राज्यात दाेन महिन्यात उष्माघाताचे ३५६ संशयित रुग्ण

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: April 14, 2023 17:51 IST

ज्येष्ठ, लहान मुले, गर्भवती माता, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण अशा व्यक्तींना उष्माघाताची जाेखीम

पुणे : उन्हाळा लागला की राज्यात उष्माघाताची शक्यता हमखास वाढते. नेहमीप्रमाणे यंदादेखील राज्यात मार्च ते १३ एप्रिल दरम्यान उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण मुंबई उपनगर, नंदुरबार आणि उस्मानाबाद येथील रुग्णांची संख्या जास्त आहे. तर पुण्यातील दाेन संशयित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्याच्या साथराेग विभागाने ही माहीती दिली आहे.

यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णता वाढली आहे. राज्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस व त्यापुढे जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. राज्यात १ मार्च ते ३१ जुलै दरम्यान उष्माघातांच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. एप्रिल महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलेले असले तरी तात्पुरता दिलासा मिळताे मात्र, उन्हाचा त्रासही हाेताेच. यामध्ये ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणा-या व्यक्ती, ० ते ५ वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण आणि अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्ती यांना उष्माघाताची जाेखीम आहे.

उष्माघाताची कारणे 

- उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे- कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम करणे- काच कारखान्यातील कामे- घट्ट कपड्यांचा वापर

लक्षणे 

- पुरळ/घामुळया- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे- पाय, घोटा आणि हातांना सूज- थकवा येणे- बेशुध्द होणे

प्रतिबंधात्मक उपाय :

- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत- भरपूर पाणी प्यावे- उन्हात जाताना डोके, कान, नाक, डोळे यांचे संरक्षण करावे.

''याबाबत जिल्हा नोडल अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास अन्वेषण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अशा रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्याचा उष्माघातामुळेच मृत्यू झाला आहे का याची अन्वेषन केले जाते. - वरिष्ठ आराेग्य अधिकारी, आराेग्य विभाग''

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यTemperatureतापमानSocialसामाजिकRainपाऊसhospitalहॉस्पिटल