शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यातील तापटपणा काढून टाका, डोक्यावर बर्फ ठेऊन काम करा: अजित पवारांचा पोलिसांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 10:56 IST

समाज माध्यम हे दुधारी अस्त्र आहे. हे माध्यम वापरताना काळजी घ्या.

ठळक मुद्देगडबड झाली तर थेट टीका करणार

पिपंरी : समाज माध्यम हे दुधारी अस्त्र आहे. हे माध्यम वापरताना काळजी घ्या. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देताना डोक्यावर बर्फ ठेवा. सौजन्याने वागा. आपल्यातील तापटपणा काढून टाका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ५) दिला. काम करताना काही गडबड झाली तर, मी थेट टीका करेन असेही त्यांनी यावेळी बजावले.

पिंपरी चिंचवड पोलिसांचा एक्स ट्रॅकर उपक्रम आणि समाज माध्यमांवरील पेजेसचा लोकार्पण सोहळा चिंचवड येथे पवार यांच्या हस्ते पार पडला. या वेळी त्यांनी पोलिसांना समाज माध्यमांवर उत्तर देताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. आमदार दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते.

समाजमाध्यम वापरताना ध चा मा होऊ नये, यासाठी अधिक काळजी घ्यायला हवी. समाज माध्यमांवर लाखो लोक तुमच्याशी जोडलेले असतात. त्यांना अचूक माहिती दिली पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तरे द्यावीत. नागरिकांशी सौजन्याने वागावे. त्यासाठी तापटपणा काढून टाका, हे तुम्हाला अजित पवार सांगतोय असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

पिंपरी-चिंचवड हद्दीत पोलीस ठाणे वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी महापालिका आवश्यक अर्थसहाय्य करेल. स्मार्ट पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते. पिंपरी-चिचंवडमधील अनेक ठाणी स्मार्ट झाली असली, तरी राज्यातील बऱ्याच ठाण्यांची अवस्था दयनीय आहे. ठाणी स्मार्ट करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे अनुकरण करा अशी सूचना करणार असल्याचे पवार म्हणाले.---

काय आहे एक्स ट्रॅकर?

सराईत आणि तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक्स ट्रॅकर हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. तडीपार गुन्हेगारांना दररोजची माहिती या माध्यमातून पोलिसांना द्यावी लागेल. तडीपार गुन्हेगारांना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले, तेथून दररोज आपला फोटो आणि ठिकाण याची माहिती पोलिसांना पाठविणे बंधनकारक असेल.---

समाज माध्यमातून नागरिकांशी संवादपोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सूचना, तक्रारी, विविध विषयांवरील मते या माध्यमातून पोलीस जाणून घेतील. त्यासाठी विविध समाज माध्यमांवर पोलीस सक्रिय झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारSocial Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारण