शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य महामंडळाच्या सूचनांवर कार्यवाही करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 00:01 IST

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.

पुणे : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. याबाबतचे पत्र शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ. श्रीपाद जोशी यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संदर्भातील मागण्यांबाबतचे निवेदन तावडे यांच्याकडे पाठविले होते. या निवेदनाबद्दल योग्य ती कार्यवाही करावी, या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष वेधत या प्रयत्नांना बळ पुरविले जाण्याची नितांत गरज आहे, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.महामंडळाने मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनासाठी अडीच वर्षांत सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामधील सुमारे३० सूचना, मागण्या, निवेदने, ठराव यांचे स्वरूप चव्हाण यांनी केलेल्या या निवेदनात विशद करण्यात आले आहे.यामध्ये विधान परिषदेवरील घटनाबाह्य नियुक्त्या रद्द करणे, ८४ वर्षे प्रलंबित मराठी विद्यापीठाची मागणी, राज्याचे अद्याप जाहीर न झालेले भाषा धोरण, मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीबाबतची श्वेतपत्रिका, अनुवाद अकादमी आणि बोली विकास केंद्राची स्थापना, अभिजात दर्जासंबंधी चाललेली चालढकल, बंद पडत असलेल्या प्राथमिक शाळा, बृहन्महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भाषा धोरण, राज्य सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना आदींचा समावेश आहे.मराठी भाषेबाबतच्या मागण्या शासन दरबारी पडून असून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्ष राजकीय कृती करण्याचे आवाहन जोशी यांनी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना केले आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणPuneपुणे