शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टँकर माफियांवर कारवाई करणार; पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:39 IST

येरवडा, वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रातून पाण्याची चोरी करून ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवले जाते. याची दखल घेत पालिका आयुक्तांनी कुणाल कुमार यांंनी टँकर माफियांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देमाफिया पालिका कर्मचार्‍यांना मॅनेज करून एकाच पासवर करतात ४ ते ५ टँकर पाण्याची चोरीवडगावशेरी, येरवडा या टँकर भरणा केंद्रावरून दिवसाला पन्नास ते साठ लाख लिटर पाण्याची चोरी

लोकमत इफेक्टकोरेगाव पार्क : येरवडा आणि वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रातून पाण्याची चोरी करून  ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवले जाते. या टँकर माफियांचा पर्दाफाश करणारी बातमी  दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल पालिका आयुक्तांनी कुणाल कुमार यांंनी घेत,  पाणी चोरणार्‍या टँकर माफियांवर कारवाई करणार असल्याचे  सांगितले.महापालिका टँकर भरणा केंद्रावर पाणी भरण्यासाठी टँकर मालकांना पालिकेकडून पास घ्यावे लागतात. एका पासावर दहा हजार लिटर पाणी मिळते. टँकर मालकांना ठराविक पास दिले जातात. टँकर भरणा केंद्रातील कर्मचार्‍याला पास दिल्यानंतर टँकरमध्ये पाणी सोडले जाते. पास नसेल तर टँकर मालकांना पाणी मिळत नाही, अशी टँकर भरणा केंद्रावरील कार्यपध्दती आहे. मात्र, टँकर माफिया अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांना मॅनेज करून एकाच पास वर ४ ते ५ टँकर पाण्याची चोरी करतात. काही जण  पास न देताच पाण्याची चोरी करतात. टँकर भरणा केंद्रावरील रजिस्टरमध्ये या टँकरची नोंद नसते. महापालिकेने टँकर भरणा केंद्रावरून पाणी घेणार्‍या खासगी टँकरला जीपीआरएस यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर चालकांना पाणी भरण्याचे पास न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अमंलबजावणी  प्रत्यक्षात टँकर भरणा केंद्रावर होत नसल्याचे समोर आहे. वडगावशेरी टँकर भरणा केंद्रावरून पाणी भरणार्‍या माफियानी जीपीआरएस यंत्रणा बंद करून, पालिकेच्या हद्दीबाहेरील गावा बाहेर पाणीपुरवठा करतात. वडगावशेरी आणि येरवडा या दोन टँकर भरणा केंद्रावरून दिवसाला पन्नास ते साठ लाख लिटर पाण्याची चोरी होते. केंद्रावरील मीटर बंद आहेत. येरवडा टँकर भरणा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत. पाणी सोडणारा इलेक्ट्रीकल व्हॉल बंद आहे.टँकर भरणा केंद्रातील या घोटाळ्याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, की टँकरचे जीपीआरएस बंद करणे, ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसाय करणार्‍या पाणी पुरवणे, टँकर भरणा केंद्रावर  पाणी  चोरणार्‍यांवर कारवाई करणार आहे. कारवाईची सूचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीtheftचोरीPuneपुणे