सातवीतील विद्यार्थिनींकडून तैलबैला सुळका सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:49+5:302021-01-17T04:09:49+5:30
वास्तविक हा कातळ कडा सर करणे ट्रेकर्सना मोठे आव्हान आहे. परंतु सातवीच्या वर्गातील शुभदाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ...

सातवीतील विद्यार्थिनींकडून तैलबैला सुळका सर
वास्तविक हा कातळ कडा सर करणे ट्रेकर्सना मोठे आव्हान आहे. परंतु सातवीच्या वर्गातील शुभदाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राचे आणि गडकोटांची माहिती मिळवून वक्तृत्वाचे माध्यमातून ते समाजात पोहोचविण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बा रायगडची पूर्ण टीम, मुंबईतून आलेले ट्रेकर्स व वडील शाम बवले यांच्या नेतृत्वाखाली शुभदाने तैलबैला शिखर सर केला.
या यशाबद्दल श्री शरदचंद्र विद्यालयचे मुखाध्यापक अंकुश सांडभोर, सर्व शिक्षक व ग्रामस्थांकडून शुभदाचे कौतुक केले जात आहे.
तैलबैला सुळका सर केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना ट्रेकर्स.