शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 23:46 IST

बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या.

बारामती - गाडीमध्ये कोणाला तरी बसवायचं, लगेच रिल्स तयार करायची, ती सोशल मिडियावर पोस्ट करायची, आणि त्याला कॅप्शन द्यायचे ताई माझ्या हक्काची. हे एकच हक्काचं काम त्यांनी केले. मोठ्या ताईंचा एकेक व्हिडीओ पाहून मला हसूही येते अन् वाईटही वाटतं. सध्या त्यांची वाढलेली धावपळ आणि मानसिक संतुलन ढासळलेले पाहत आहे, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली.बारामती येथे भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी हि टीका केली.त्या पुढे म्हणाल्या सुळे यांच्या कार्यअहवालात ‘अजितदादां’नी केलेलीच कामे दाखविण्यात आली आहेत.त्यामुळे तो कार्यअहवाल नक्की कोणाचा,असा प्रश्न पडतो,असे चित्रा वाघ म्हणाल्या.

यावेळी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेच्या भाषणात नाव न घेता अप्रत्यक्ष शरद पवार यांना भटकत्या आत्म्याची उपमा दिली होती. या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, साहेबांनी का जीवाला लागून घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर कुणाचाही नाव घेतले नाही. ज्याने त्याने आपापल्या अंगाला लावून घेतले तर त्याला आम्ही काय करणार. नाव न घेताच आम्हालाच बोलले असं म्हणण चुकीचं असल्याचा टोला त्यांनी लगावला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राऊतांचे काय ऐकता. ते सर्व ज्ञानी आहेत. ते काँग्रेसच्या फडावर तुणतुण घेऊन नाचायचं काम करतात. लोकांना फसवून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेले ते आरोपी असल्याचे त्या म्हणाल्या.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घरातील आणि बाहेरील अशी केलेली संभावना धक्कादायक असल्याचे त्या म्हणाल्या. बारामतीची सूनच लोकसभेत जाईल असे त्या म्हणाल्या. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chitra Waghचित्रा वाघSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा