शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाकडून चित्रकाराला गरम झाऱ्याने चटके, अदखलपात्र गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 05:30 IST

याबाबतची माहिती अशी, सुनील अष्टेकर हे चित्रकार असून संभाजी उद्यानात ते १८ जुलैला रात्री चित्र काढत बसले होते़ बॉबी काकडे हा तेथे आला.

पुणे : जंगली महाराज रोडवरील सन्मान हॉटेलच्या जवळ एका तडीपार गुंडाने एका चित्रकाराला गरम झाऱ्याने हाताला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, ही घटना १८ जुलै रोजी रात्री सव्वा नऊ वाजता घडली. याप्रकरणी संजय चंद्रकांत अष्टेकर (वय ५०, रा़ शितोळेनगर, जुनी सांगवी) यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली होती. 

याबाबतची माहिती अशी, सुनील अष्टेकर हे चित्रकार असून संभाजी उद्यानात ते १८ जुलैला रात्री चित्र काढत बसले होते़ बॉबी काकडे हा तेथे आला. त्यावेळी तो दारु पिलेला होता़ त्याने अष्टेकर यांच्याकडे २ हजार रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्यावर त्याने तेथील गरम झारा घेऊन त्यांच्या हाताला चटके दिले़ या घटनेला आता १० दिवस झाल्यानंतरही त्याच्या जखमांचे व्रण अजून हातावर दिसून येतात़ त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली़ तडीपार गुंड शहरात येऊन एखाद्याला चटके देतो, हाताने मारहाण करतो, असा गंभीर प्रकार घडला़ तरीही डेक्कन पोलिसांनी त्याच्या तक्रारीची नोंद अदखलपात्र केली. डेक्कन जिमखान्यावरील जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल रात्री उशिरापर्यंत गर्दीने ओसंडून वाहत असतात़ तेथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक व लोकांची ये जा असते़ अशा ठिकाणी तडीपार गुंड येऊन एखाद्याला चटके देतो, ही गंभीर घटना घडूनही त्यावर काहीही कारवाई होत नाही़. बॉबी काकडे याला शिवाजीनगर पोलिसांनी तडीपार केले आहे़ असे असतानाही या घटनेमुळे तो शहरात येऊन राजरोजपणे वावरत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फिर्यादीने आम्हाला संपूर्णपणे हकीकत सांगितलेली नाही़ त्यांनी जेवढी माहिती दिली़ त्यानुसार कारवाई केली आहे़ बॉबी काकडे याचा पोलीस शोध घेत आहे़ तो सापडल्यावर त्याच्या कारवाई करण्यात येईल. मात्र, इतका गंभीर गुन्हा असताना व हा गुन्हा तडीपार गुंडाने केला असल्याचे दिसून येत असतानाही गेल्या १० दिवसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दखलपात्र गुन्ह्यात होऊ शकत नाही़ वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्यावर काहीही कारवाई करताना दिसून येत नाही.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस