तडीपार गुंडाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST2021-06-11T04:08:58+5:302021-06-11T04:08:58+5:30

पुणे : तब्बल १२ गुन्हे असलेल्या तडीपार केलेला असतानाही गुंड येरवडा गावठाणात पुन्हा फिरत असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने ...

Tadipar gangster arrested | तडीपार गुंडाला अटक

तडीपार गुंडाला अटक

पुणे : तब्बल १२ गुन्हे असलेल्या तडीपार केलेला असतानाही गुंड येरवडा गावठाणात पुन्हा फिरत असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार गुंडाला पकडले. त्याच्याकडून कोयता हस्तगत केला आहे.

शफिक ऊर्फ शफ्या बशीर खान असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. शहर पोलिसांनी गुंडांवर कारवाई करुन अनेकांना तडीपार केले आहे. असे असले तरी हे गुन्हेगार तडीपार केले असतानाही पुन्हा शहरात येऊन गुन्हे करीत असल्याचे आढळून आले आहे. अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, हवालदार राजेश शेख, नागेशसिंग कुंवर, कौस्तुभ जाधव यांना माहिती मिळाली की, शफिक खान हा तडीपार असतानाही येरवडा गावठाणात आला आहे. या माहितीवरून पोलिसांनी येरवडा गावठाण येथे शोध घेऊन पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आला. शफिक ऊर्फ शफ्या बशीर खान (रा. येरवडा गावठाण) असे त्याचे नाव आहे.

खान याच्याविरुद्ध खून, अमली पदार्थ बाळगणे याच्यासह १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Tadipar gangster arrested