शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Video: टाळ-मृदंगाच्या घोषात अन् विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन; सुप्रिया सुळे वारीत सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 13:33 IST

नववारी साडी, कपाळी नामा अन् हसतमुख चेहऱ्याने सुप्रिया सुळे वारीत सहभागी

पुणे: संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट सहज पार केला . माऊलींच्या पालखीचे सासवडकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला. दिवे घाटात खासदार सुप्रिया सुळे वारीत सहभागी झाल्या होत्या. 

माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी वारीला सुरुवात केली. वारीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, वारकऱ्यांशी संवाद साधत, चिमुकल्यांबरोबर या सोहळ्याचा आनंद घेत वारीत सहभाग नोंदवला.''विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात दिवेघाटात काल सहभागी झाले. शतकांपासून वारकरी या मार्गवरुन पंढरीकडे मार्गस्थ होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी, टाळ - मृदंगाच्या घोषात विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. तेव्हा अवघा रंग एक झाल्याचा अनुभव येतो अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.  

दिवे घाट ते झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, पवारवाडी ते  सासवडपर्यंत माऊलींच्या पालखी  सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माउलींच्या दर्शनासाठी दिवे घाट  परिसरात  भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. विविध संस्था , संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. वडकी येथून दुपारी ३ वाजता सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला. साडेतीनच्या दरम्यान सोहळा दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचला. रथाला वडकी, फुरसुंगी परिसरातील चार बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या. टाळ मृदुगांचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास  सुरुवात केली. दिवे घाट माथ्यावर  विश्रांती घेऊन सोहळा सासवडकडे कडे मार्गस्थ झाला. पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने हा मोठा प्रवास व या दिवशी एकादशी असल्याने उपवास असतो त्यामुळे वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती.

वारीत तरुणांची संख्या लक्षणीय 

दिवेघाट चढून माथ्यावर आलेल्या लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनी माउलींच्या सोहळ्या बरोबर चालून वारीचा आनंद घेतला. या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांनी घाटातील वाहनं पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली. त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला. माऊलीसह वैष्णवांनी  झेंडेवाडी फाट्यावर विसावा घेतला. यानंतर पालखी सासवड मुक्कामी पोहचल्यानंतर माऊलींच्या पालखी तळावर समाज आरती झाली व सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी