शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाला सईद मिर्झा यांचा पाठिंबा

By admin | Updated: August 17, 2015 02:22 IST

एफटीआयआयचे अध्यक्षपद केवळ प्रशासकीय कामापुरते मर्यादित नाही. धोरणात्मकदृष्ट्या या पदाला खूप महत्त्व आहे, असे नमूद करून एफटीआयआयचे माजी अध्यक्ष

पुणे : एफटीआयआयचे अध्यक्षपद केवळ प्रशासकीय कामापुरते मर्यादित नाही. धोरणात्मकदृष्ट्या या पदाला खूप महत्त्व आहे, असे नमूद करून एफटीआयआयचे माजी अध्यक्ष सईद मिर्झा यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मिर्झा यांनी रविवारी विद्यार्थ्यांची भेट घेऊन अध्यक्षपदावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद सादला.अनेक दिवसांपासून चालू असलेला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा लढा हे अन्यायाविरुद्ध चालू असलेले आंदोलन आहे. आणि यासंदर्भात विद्यार्थ्यांना लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा, अशी अपेक्षाही मिर्झा यांनी या वेळी व्यक्त केली. मी स्वत: या पदावर काम केलेले असल्याने हे पद केवळ प्रशासकीय कामकाजापुरतेच मर्यादित नाही, तर या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थेचे धोरणात्मक निर्णय अशा सर्वदृष्टीने संस्थेशी संबंध येत असतो. त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचे असून अध्यक्ष हा समग्र भूमिका घेणारा असायला हवा. तसे होत नसल्यास त्याबाबतीत शासनाने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या म्हणण्याचा जरुर विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन लावून धरावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. एफटीआयआयसारख्या संस्थांना स्वातंत्र्य असावे, यासाठी स्वायत्त करण्यात आलेले असताना अशा प्रकारची मनमानी करणे योग्य नाही. एफटीआयआयकडे सेंटर फॉर एक्सलन्स म्हणून पाहिले जात असताना अशा प्रकारची हुकूमशाही करणे चुकीचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या म्हणण्यासाठी इतके दिवस लढा द्यायला लावणे ही पण खेदाचीच बाब असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनाचा विचार केवळ एका संस्थेचे आंदोलन असा न करता हे देशातील एक आंदोलन आहे, असा विचार झाला पाहिजे. अशा प्रकारची आंदोलने केवळ आपल्या देशातच होतात असे नाही तर हा प्रश्न जगभरातील आहे, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)