एकात्मतेची शपथ, प्रभातफेरी, मतदार जागृती रॅली
By Admin | Updated: January 28, 2017 01:53 IST2017-01-28T01:53:37+5:302017-01-28T01:53:37+5:30
६८वा प्रजासत्ताक दिन विविध संघटना, शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

एकात्मतेची शपथ, प्रभातफेरी, मतदार जागृती रॅली
पुणे : ६८वा प्रजासत्ताक दिन विविध संघटना, शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
एकात्मतेची शपथ
शिवाजीनगरच्या मृत्युंजय मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. फैयाज शेख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
घोरपडे पेठेतील रामभाऊ ननावरे चौकात महाराष्ट्र राज्य जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे संसदीय महामंडळाचे सदस्य अशोक गायकवाड यांच्या वतीने ध्वजवंदन, तिळगूळवाटप व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विलास भंडारी, इस्माईल शेख, इब्राहिम यवतमाळवाले, चंद्रकला पुंडे, चंदा कदम, मनीष सुटे, अॅड. शबीर खान आदी उपस्थित होते.
नेत्रचिकित्सा शिबिर,
फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेच्या विविध शाखांच्या वतीने नेत्रचिकित्सा शिबिर, खाऊवाटप, शालेय वस्तूंचे वाटप, अंध मुलांना अभ्यासिका मशिनचे वाटप, निराधार महिलांना साड्यावाटप, तसेच रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कराटेची प्रात्यक्षिके
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उज्ज्वला पळीवाले उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी कराटेची प्रात्याक्षिके व पिरॅमिडचे सादरीकरण केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला देशमुख, पर्यवेक्षिका अनुजा पाटील, सि. धों. आबनावे कला महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्याणी साळुंके, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
परिक्रमा अनुभवकथन
योग-आनंद संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नर्मदा परिक्रमा २ वेळा पूर्ण केलेले लक्ष्मण दगडे यांचा सत्कार आनंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. लक्ष्मण दगडे यांनी या वेळी त्यांच्या परिक्रमेतील अनुभवांचे कथन केले. या वेळी योग आनंद संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गांधी, महादेव औंधकर, हेमंत गांधी, संजय जकाते, सुनील निवते, विनायक दगडे, विकास घाणेकर आदी उपस्थित होते.
गुणवंताने केले ध्वजवंदन
नूमवी प्रशालेतही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. १२वी बोर्ड परीक्षेत वाणिज्य शाखेत प्रथम आलेली विजया राठोड हिच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, आझम कॅम्पस येथे भारताचे माजी केंद्रीय मंत्री अरीफ खान यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार होते.
तिरंगा सन्मान रॅली
मिशन आॅफ आंबेडकर या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा
सन्मान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा मिशन आॅफ आंबेडकर या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अरुण भालेराव यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. मोमिनपुरा सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सर्व समाजासाठी हीजामा, शुगर चेकअप, उच्च रक्तदाब तपासणी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.