त्यामध्ये स्वाती केमसे याचा एकमेव उमेदवारी अर्ज आला. सदर निवडणूक प्रसंगी सरपंच मालन जाधव ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव , वैशाली सुपेकर , दत्तात्रय केमसे, सुजाता घारे, सोनाली खाणेकर, संदीप सुपेकर हे हजर होते. सदर प्रसंगी भा.ज.पा. जिल्हा उपाध्यक्ष अशोक साठे, शिवसेना उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर केमसे, मा. उपसरपंच विलास केमसे, ह भ प तानाजी केमसे, संभाजी केमसे, जयवंत केमसे, लक्ष्मण केमसे, स्वप्नील केमसे, नानासाहेब घारे, नथु रसाळ, शरद घारे, राजेंद्र घारे, अरुण घारे, संजय घारे, चंद्रकांत केमसे, रामभाऊ केमसे, तुकाराम केमसे, विठ्ठल केमसे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर यांनी काम पाहिले, तर सदर निवडणूक शासकीय नियम पाळून पार पडली अशी माहिती संभाजी केमसे यांनी दिली.
जवळच्या उपसरपंच पदी स्वाती केमसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:09 IST