शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकरही शिक्षेदरम्यान तुरूंगात तुकारामांचे अभंग गात असत: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:47 IST

PM Narendra Modi Visit Pune : मंगळवारी देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. 

PM Narendra Modi Visit Pune : मंगळवारी देहूत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. “आपली राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. म्हणूनच आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचा पर्याय बनत आहेत, तेव्हा विकास आणि वारसा हे एकत्र पुढे जावे, याची आम्ही खात्री करत आहोत,” असं मोदी यावेळी म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत जेव्हा वीर सावरकर यांना शिक्षा झाली, तेव्हा तुरूंगात ते तुकाराम महाराजांचे अभंग गात असत,” असंही मोदींनी यावेळी सांगितलं. संत तुकाराम महाराजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या 'अभंगां'च्या रूपात अजूनही आहे. या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे भंग होत नाही, जो शाश्वत आणि प्रासंगिक असते, तोच अभंग असल्याचंही त्यांनी म्हटलं. भारत शाश्वत आहे कारणी ती संतांची भूमी आहे. आज देश सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास यावर चालत आहे. सरकारच्या प्रत्येक योजनांचा लाभ कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मिळत आहे. महिला सबलीकरणासाठीही प्रयत्न केले जातायत. पंढरपूरची वारी ही समानतेचं प्रतिक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdehuदेहूMaharashtraमहाराष्ट्र