स्वप्निल विश्वासराव सूत्रधारांपैकी एक

By Admin | Updated: March 26, 2017 02:05 IST2017-03-26T02:05:11+5:302017-03-26T02:05:11+5:30

महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणात सायबर सेलने आणखी एकाला अटक केली असून या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९

Swapnil Vishwasrao is one of the facilitators | स्वप्निल विश्वासराव सूत्रधारांपैकी एक

स्वप्निल विश्वासराव सूत्रधारांपैकी एक

पुणे : महाराष्ट्र बँक फसवणूक प्रकरणात सायबर सेलने आणखी एकाला अटक केली असून या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे़ स्वप्निल दिलीप विश्वासराव (रा़ तेजेवाडी,
ता़ जुन्नर) असे त्याचे नाव आहे़ स्वप्निल विश्वासराव हा प्रमुख सूत्रधारांपैकी एक आहे़
यूपीआय अ‍ॅपद्वारे खात्यात पैसे नसतानाही ६ कोटी १४ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात सायबर सेलने आतापर्यंत ९ जणांना अटक केली आहे़ स्वप्निल विश्वासराव याला पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली़ पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते़ विश्वासराव याने ६ जणांचे बँक खाते व लिंक मोबाईल घेऊन त्यावरून एकूण ४७ व्यवहार केले़ त्याद्वारे ३७ लाख रुपयांचा अपहार झाला आहे़ त्याच्या बँक खात्यात १४ लाख रुपये हस्तांतरीत झाले असून त्यापैकी ६ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे़ उर्वरित ८ लाख रुपयांबाबत तपास करायचा आहे़ हे व्यवहार करण्यासाठी ११ मोबाईलचा वापर करण्यात आला असून ते हँडसेट जप्त करायचे आहेत़ विश्वासराव हा गणेश ढोमसे तसेच फरार आरोपी राजेश बुदुखळे, विनोद नायकोंडी, महेंद्र ढोमसे, संदीप मुळे यांनी मिळून हा गुन्हा केला आहे़
त्यानंतर ते सर्व फरार झाले होते़ त्यामुळे फरार आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने विश्वासराव याला ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़
(प्रतिनिधी)

Web Title: Swapnil Vishwasrao is one of the facilitators