स्वरानंद माझा श्वास : प्रकाश भोंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:00 PM2019-11-29T22:00:00+5:302019-11-29T22:00:02+5:30

स्वरानंद म्हटले की प्रकाश भोंडे हे जणू एक समीकरण..

swanand is my breath: Prakash bhonde | स्वरानंद माझा श्वास : प्रकाश भोंडे

स्वरानंद माझा श्वास : प्रकाश भोंडे

Next
ठळक मुद्देप्रकाश भोंडे यांना '' इंदिराबाई अत्रे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार

सत्तरीच्या दशकात दजेर्दार सांस्कृतिक कार्यक्रम करणारी एकमेव संस्था असा नावलौकिक असलेल्या ''स्वरानंद '' प्रतिष्ठान  ने सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल केली आहे. स्वरानंद म्हटले की प्रकाश भोंडे हे जणू एक समीकरणच सांस्कृतिक विश्वात दृढ झाले आहे. गेल्या 45 वर्षांपासून संस्थेच्या कार्यकारी विश्वस्तपदाची धुरा समर्थपणे ते  सांभाळत आहेत. विशेष म्हणजे, आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या वतीने  उद्या ( 30 नोव्हेंबर) प्रा.प्रकाश भोंडे यांना '' इंदिराबाई अत्रे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. '' स्वरानंदचे सुवर्णमहोत्सवी वर्षातील पदार्पण आणि पुरस्कार हा दुर्मिळ योग साधत त्यांच्याशी  '' लोकमतने ''साधलेला हा संवाद. 

नम्रता फडणीस- 

* इंदिराबाई अत्रे पुरस्कारामागची भावना काय?
_- माज्या मनात पुरस्काराबददल अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे. इतकी वर्षे सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहे. त्याची कुठतरी दखल घेतली गेली आणि विशेषत्वाने डॉ. प्रभा अत्रे यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जात आहे याचा विशेष आनंद आहे. 
*  स्वरानंद पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे, या संस्थेशी ॠणानुबंध कसे जुळले?
-  आम्ही काही मित्रमंडळींनी महाविद्यालयीन शिक्षणकाळात ह्यस्वरानंदह्ण ची सुरूवात मिळून केली असली तरी या संस्थेचे संस्थापक हे विश्वनाथ ओक आणि हरिश देसाई आहेत. मी केवळ पडद्यामागचा कलाकार होतो. 7 नोव्हेंबर 1970 रोजी आम्ही सर्वप्रथम  ह्यआपली आवडह्ण नावाचा कार्यक्रम केला. आकाशवाणीवर रसिकांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम  ह्यआपली आवडह्ण हे शीर्षक घेऊन पहिल्या कार्यक्रमाची निर्मिती केली. मधल्या टप्प्यावर वैयक्तिक कामामुळे त्यांनी संस्था सोडली आणि संस्थेची धुरा माज्याकडे आली.
* ही सुवर्णमहोत्सवी वाटचाल कशी होती?
-   ह्यस्वरानंदह्ण ने  पहिल्या पासूनच व्यावसायिक भूमिकेतून काम केले नाही.  कार्यक्रम ह्यहाऊसफुल्लह्ण होण्याच्या मागे कधीच धावलो नाही. जसे जसे प्रयोग होत गेले तसे ते करत गेलो. आम्हाला कार्यक्रम करणे जास्त आवश्यक वाटले उदा: साहित्य, संगीत क्षेत्रातील कुणाची साठी,पंचाहत्तरी असेल तर त्यानिमित्ताने कार्यक्रम करणे आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हाच केवळ उदात्त हेतू होता. सुरूवातीचा पहिला दहा वर्षांचा काळ मोठा  गंमतीशीर होता. कारण आमच्याव्यतिरिक्त वाद्यवृंद क्षेत्रात इतर कोणीच स्पर्धक नव्हता. त्यामुळे आमचा रूबाब होता. आश्चर्य वाटेल पण गणपती, नवरात्र चे प्रयोग फुल्ल असायचे. पण आम्ही कधी कुणाशी स्पर्धा केली नाही. पु.ल देशपांडे संगीतकार आहेत हे आम्ही  ह्यपुलकीत गाणीह्ण कार्यक्रमातून सर्वप्रथम समोर आणले. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये ट्रस्ट स्थापन करून प्रतिष्ठानमध्ये रूपांतर केले. सुधीर मोघे अध्यक्ष आणि गजानन वाटवे हे मानद विश्वस्त होते. त्यानंतर संस्था समाजाभिमुख झाली. 
* सध्याच्या स्पर्धेच्या युगात  ह्यस्वरानंदह्ण समोरची आव्हाने कोणती ? संस्थेचा टिकाव लागेल का?
- गेल्या दहा वर्षात आमची अशी भावना झाली की सांस्कृतिक क्षेत्रात आता  ह्यस्वरानंदह्ण ची आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे आता बाहेर पडायला हरकत नाही. पण पूर्णपणे बाहेर पडणे शक्य नाही. हळूहळू कामाचे स्वरूप कमी केले आहे.रोटरी क्लब, निधी संकलन वगैरेसाठी आम्ही कार्यक्रम करतो. 
* पन्नास वर्षांची वाटचाल केलेल्या या संस्थेने शासकीय अनुदानासाठी प्रयत्न केले नाहीत का?
- संस्थेला पंधरा वर्षांपूर्वी केवळ एकदाच रामकृष्ण मोरे हे मंत्री असताना 25 हजार रूपयांचे अनुदान मिळाले होते. स्वरानंदचा ट्रस्ट करण्यात आला होता. तेव्हा आमच्याकडे सर्व कागदपत्रे आणि लेखापरीक्षण अहवाल होते. पण अनुदानाची प्रक्रिया खूप किचकट वाटली. त्यामुळे अनुदानासाठी प्रयत्नच केले नाहीत. आम्हाला स्वत:हून देणग्या देणारे अनेक देणगीदार आणि रसिक मंडळी मिळाली. त्या निधीमधून आम्ही कार्यक्रम करण्यावर भर दिला.
* संस्थेच्या आगामी योजना कोणत्या ?
- संस्थेने भावगीतांचा कोश करण्याचे काम हाती घेतले असून, ते अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. 
-------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------
 

Web Title: swanand is my breath: Prakash bhonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.