शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उरुळीकांचन हद्दीत एका महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदनाशिवाय तातडीने केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:19 IST

दोघांच्याही मृत्युबद्दल परिसरात संशयाचे वातावरण निर्माण

पुणे (उरुळी कांचन) :- उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात मागील दहा दिवसांच्या कालावधीत, दोन वेगवेगळ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वरील दोन्ही घटनेत मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या परस्पर दोघांवर शवविच्छेदनाशिवाय तातडीने अंत्यसंस्कार केल्याने, दोघांच्याही मृत्युबद्दल परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या टिळेकरवाडी खामगांव टेक परिसरातील शेतामधील कडबा कुट्टी मशिन चालु करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यु झाला होता. कामगाराचा मृत्यु नैसर्गिक नसल्याने,घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी मृताच्या नातेवाईकांना तोंडी कल्पना देऊन, पोलिसांच्या परस्पर तेही शवविच्छेद न करता संबधित व्यक्तीवर तातडीने अंत्यसंस्कार केले होते. तर दुसऱ्या घटनेत उरुळी कांचन परिसरातील एका तीस वर्षीय महिलेचा दोन दिवसापुर्वी संशयास्पदरित्या मृत्यु झाला होता. ही माहिती उरुळी कांचन पोलिस चौकीत पोहचण्यापुर्वीच, मृतांच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणीवर अंत्यसंस्कार केल्याची बाब पुढे आली आहे. 

याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे म्हणाले, दहा दिवसापुर्वी खामगांव टेक य़ेथे कडबा कुट्टी मशिन चालु करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यु झाला ही बाब खरी आहे. विजेचा धक्का लागल्याने एकाचा जागीच मृत्यु झाल्याची बाब समजताच, आमचे कर्मचारी जाण्यापुर्वीच संबधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्याचे समजले होते. याबाबत तक्रार न आल्याने, ही बाब आम्हीही पोलिसांना कळवली नव्हती. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी म्हणाले, उरुळी कांचन परिसरात दहा दिवसाच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घटनेत एका तीस वर्षीय महिलेसह दोघांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. या घटनांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस