शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील भाजपा-काँग्रेसच्या उमेदवारीवरील पडदा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:44 IST

लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरील पडदा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू असून, अद्याप पुण्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही.

पुणे - लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरील पडदा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू असून, अद्याप पुण्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचे सगळे इच्छुक दिल्लीत ठाण मांडून बसले असून, भाजपाचे इच्छुक मात्र पुण्यातच दिसत आहेत.राजकीय वर्तुळाशिवाय सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही या दोन्ही प्रमुख पक्षांच्या पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराविषयी उत्सुकता आहे. काँग्रेसकडून भाजपाचे सहयागी खासदार संजय काकडे, संभाजी ब्रिगेड व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य पदाधिकारी प्रवीण गायकवाड तसेच माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड हे इच्छुक आहेत. हे चौघेही शुक्रवारी रात्रीत दिल्लीकडे रवाना झाले. शनिवारी दुपारी ४ वाजता दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची बैठक सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पुण्यातील उमेदवारीबाबत काहीही चर्चा झाली नाही.भाजपाच्या निवड समितीचीही शनिवारी दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती येथील कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र बैठकीचा तपशील दिला गेला नाही. भाजपाकडून पुण्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट या दोघांची नावे प्राधान्याने घेतली जात आहेत. त्याशिवाय पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचेही नाव नवा चेहरा म्हणून चर्चेत आहे. तसेच शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही लोकसभेसाठी पक्षाने उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपातही चुरस आहे.या दोन प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांची मतदारसंघात रोज चर्चा सुरू आहे. कोणासमोर कोण टिकेल, कोण भारी पडेल, कोणाला मतदान होणार नाही, कोणाला जास्त मतदान मिळेल यावर चौकांचौकांमध्ये चर्चा झडत आहेत. दोन्ही पक्षांनी नावाबाबत गुप्तता बाळगली आहे. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार पाहून नंतर नाव निश्चित करायचे असा विचार पक्षाचे नेते करत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता शनिवारी तसेच रविवारीही नाव जाहीर होणार नाही, थेट येत्या सोमवारीच दोन्ही पक्ष नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.उमेदवार जाहीर होईनातउमेदवार जाहीर होत नसले तरी दोन्ही पक्षांच्या संघटनात्मक स्तरावर मात्र पक्षाचे काम जोरात सुरू आहे. मतदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या, त्यांच्या बैठका, त्यांना मार्गदर्शन, निवडणूक आयोगाच्या सूचना, प्रचाराच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना असे दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका होत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपा