शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची हेळसांड

By admin | Updated: March 19, 2015 22:52 IST

आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची हेळसांड झाल्याचा प्रकार ताजा असताना वेल्हे तालुक्यातील करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडला आहे.

मार्गासनी : भोर तालुक्यातील नसरापूर येथील आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची हेळसांड झाल्याचा प्रकार ताजा असताना वेल्हे तालुक्यातील करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रातही असाच प्रकार घडला आहे. शस्त्रक्रियाझालेल्या महिलांना जमिनीवर सतरंजीवरच झोपवण्यात आले होते. माजी सभापती चतुरा नगिने यांनी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कंरजावणे येथे नव्यानेच सुसज्ज अशी इमारती बांधली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक १७ मार्च रोजी १५ महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. फक्त पाच खाटा उपलब्ध होत्या. उर्वरित महिलांना तेथील एका खोलीमध्ये जमिनीवरच सतरंजी टाकून झोपवण्यात आले होते. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. माने हेदेखील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. अतिरिक्त कार्यभार असलेल्या डॉ. माधवी शिंदे यांनी या वेळी बोलताना, ‘‘माझ्याकडे अचानकपणे हा अतिरिक्त कार्यभार टाकण्यात आल्याने तातडीने सुविधा करता आल्या नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना रुग्ण महिलांना सुविधा देण्याबाबत सांगूनदेखील त्यांच्याकडून कार्यवाही झाली नाही,’’ असे सांगितले. या वेळी महिला रुग्ण सारिका सागर वालगुडे, अनिता यादव यांच्या नातेवाइकांनीदेखील तक्रारींचा पाढा वाचला. मागील शस्त्रक्रिया कॅम्पच्या वेळीदेखील असाच प्रकार झाला होता. त्या वेळी तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यावर सुधारणा करण्याची ग्वाही कर्मचाऱ्यांनी दिली होती. परंतु, आजच्या प्रकाराने त्यामध्ये काही सुधारणा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.वास्तविक, या रुग्णालयात १३ खाटा उपलब्ध आहेत. मात्र, येथील कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या सर्व खाटा वापरात नाहीत. फक्त पाचच खाटा वापरात आहेत. (वार्ताहर)हे प्राथमिक आरोग्य केंद्र चांगल्या दर्जाचे आहे. काही त्रुटी असतीलही. शिबिराच्या वेळी महिलांच्या शस्त्रक्रियांची मागणी जास्त असते. आपल्याकडे खाटांचे प्रमाण कमी असते. आम्ही त्यांना सांगूनही त्या आग्रही असतात. त्यांच्या मागणीनुसारच या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, त्यांना गाद्या, रजईची योग्य व्यवस्था केली जाते. या आरोग्य केंद्रात नेमके काय घडले आहे, याची माहिती घ्यावी लागेल.- डॉ. एन. डी. देशमुख , जिल्हा आरोग्य अधिकारी४करंजावणे येथे एक कोटी ३० लाख रुपये खर्चातून अद्ययावत असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. ४वर्षभरापासून हे रुग्णालय चालू करण्यात आले आहे; मात्र तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्याचा योग्य वापर होत नाही. ४रुग्णालयात पाण्याची गैरसोय असून, त्यामुळे शौचालय व इतर ठिकाणी स्वच्छता राखली जात नाही. शिवाय, स्वतंत्र स्वच्छता कर्मचारीदेखील नेमण्यात आला नाही.