घोटवडेमध्ये १,१६३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:22+5:302021-04-25T04:09:22+5:30
घोटवडे : कोविड विषाणू फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून घोटवडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करण्यात ...

घोटवडेमध्ये १,१६३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
घोटवडे : कोविड विषाणू फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून घोटवडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले. घोटवडे गावासह ग्रामपंचायत हद्दीतील पाच किलोमीटरपर्यतच्या वाड्या-वस्त्या आणि आठ विभागांत ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक यांनी सर्व्हे केला.
सर्व्हे करण्यासाठी घोटवडे - शीतल घायतळे, भाग्यश्री वायकर, नीता चौधरी, भेगडेवाडी- वंदना भेगडे, मंगल भेगडे, विजया चिरमुले, शुभांगी माकर, मातेरेवाडी - राजश्री साळुंके, पुष्पा भोपे, गाडेकर, आमलेवाडी - आश्विनी राऊत, मनीषा आमले, गोडांबेवाडी १ - रीना सोनी, सविता गोडांबे, सुनंदा गोडांबे, गोडांबेवाडी २ - वैशाली सपकाळ, रेखा आंग्रे, धुमाळ, देवकरवाडी - रमेश मारणे, प्रेमलता पाटील, संध्याराणी गाडे, सुवर्णा गिरी, अनिता विभाडक,ज्योती जगले ,शेळकेवाडी, शुभांगी केसवड, उज्ज्वला भेगडे यांनी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत कुटुंब सर्वेक्षण पूर्ण केले.
याकामी पथक प्रमुख केतन छलारे तर क्षेत्रीय आधिकारी म्हणून भालेराव व राजाराम काशीलकर यांनी काम केले. सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भिमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भेगडे, राजाराम शेळके, संतोष गोडांबे, हनुमंत घोगरे, संभाजी गोडांबे, सारिका खानेकर, भाग्यश्री देवकर, वैशाली कुंभार, मंगल गोडांबे ,सोनाली मातेरे, निकिता घोगरे यांनी मार्गदर्शन केले तर पोलीस पाटील किरण शेळके , दीपक मातेरे , सुनील माकर , सोनाली आमराळे ,अर्चना गोडांबे यांनी सहकार्य केले. छलारे यांनी सदर रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी राजाराम काशीलकर यांनी दिली.
--
चौकट
विभाग कुटुंब - नागरिक घोटवडे २३९ (९१९), भेगडेवाडी - २३३ (१०३४) आमलेवाडी -६९ (२८४), गोडांबेवाडी १- ८७ (४४९), गोडांबेवाडी २- १०८ ( ५४४) मातेरेवाडी - १८१ ( ५८२) धुमाळ, देवकरवाडी -१२१ (६२०), शेळकेवाडी -१२६ (५३५) या आठ विभागांत १ हजार १६३ कुटुंब असून ४९६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४३ कोरोना संशयित रुग्ण आढळले.