शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सूर छेडिले, नदीकाठी, नदीसाठी; संगीतमय कार्यक्रमातून ‘नदी वाचवा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:49 IST

भारूडे, गीते, काव्याने दुमदुमला परिसर

पुणे : नदी किनारी छान गाणी, कविता, गझल, कथा ऐकताना सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटात, सूर्यकिरणांच्या कोवळ्या प्रकाशझोतात, पालापाचोळ्याच्या सान्निध्यात, वृक्षराजीच्या सावलीत पुणेकर रंगून गेले. नदी विषयाच्या आपुलकीच्या जाणिवा या मैफलीने अजून गडद केल्या. लहानथोरापासून सर्वांनी येथे नदी संवर्धनाचा ध्यास मनी रूजवला. संगीताच्या लहरीने येथील परिसर दुमदुमून गेला. नदी संवर्धनासाठी पहिल्यांदाच एक अनोखा संगीतमय कार्यक्रम नदीकाठी नदीसाठी जीवितनदी संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता.संथ वाहते कृष्णामाई, सांज ये गोकुळी सावळी सावळी, माझे जीवनगाणे, सिखो ना नैनो की भाषा, ओ नदी आ नदी ओ नदी नदीया आदी गाणी सादर झाली. हा मैफलीचा कार्यक्रम चंद्रकांत निगडे, अमेय वरदे, ओमकार खाडीलकर, संबोधी सोनवणे, हृषीकेश डोईफोडे, मैथिली डोईफोडे, मोहित, शुभा कुलकर्णी, मृणाल वैद्य, सागर कुलकर्णी, चंदूलाल तांबोळी यांनी सादर केला. शैलजा देशपांडे यांनी सर्वांची ओळख करून दिली. हा कार्यक्रम औंध येथील राम नदी आणि मुळा नदीच्या संगमाजवळ घेण्यात आला.नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नव्हे. तिच्यापलीकडे जाऊन तिला समजून घेतले पाहिजे. ‘झाले गेले गंगेला मिळाले’, अशी एक म्हण आहे. आपणच आपल्या गोष्टीची विल्हेवाट लावावी. तिच्यात सर्व आपण घाण, कचरा टाकतो. खरं तर आपलं नातं नदीशी राहिलेले नाही. तिचं आणि आपलं नातंच फुललेले नाही. त्यामुळे तिच्याबद्दल नागरिकांमध्ये प्रेम राहिलेले नाही. मंगेश पाडगावकर यांचे ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे गीत सादर झाले आणि मातीशी काय नातं असते ते उलगडलं. नदी तृष्णा तृप्तीचे कार्य करीत आली आहे. पण आता तिच्या जागी धरणे आली आहेत. या धरणांमुळेच आपण पाणी पितो, असेच अनेकांना वाटते, अशी आजची विचार करण्याची पद्धत उलगडली.‘विंचू चावला’तून नदी स्वच्छतेचा संदेशअगंगं विंचू चावला हे विडंबनात्मक काव्य सादर केले. नदीला जणू काही विषारी केमिकलचा विंचू चावला आहे. त्यामुळे तिची अवस्था दयनीय झाली आहे. मलवाहिनी दररोज नदीला नांगी मारत आहे. दररोज त्यातून किती तरी केमिकल नदीत जात आहे. परिणामी नदी नाल्यासारखी विपन्नावस्थेत आहे. यावर एकच उतारा आहे. घरातून जाणारे केमिकल बंद करणे. नैसर्गिक जीवनशैली अंगीकारणे. त्यातूनच घरबसल्या नदी स्वच्छ होऊ शकते, असा संदेश या ‘विंचू चावला’ काव्यातून देण्यात आला.शैलजा देशपांडे म्हणाल्या, आपली फुफ्फुसे आपणच संरक्षित करणे आवश्यक आहे. जंगल हे आहे तसे ठेवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विकासासाठी या जंगलाचे नुकसान नकोय. भ्रामक विकासाच्या कल्पनेमागे न जाता शाश्वत विकासाकडे जायला हवे.नदीत दूषित पाण्याचा थेंब नकोनदी संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते अनिल गायकवाड म्हणाले, ‘‘सध्या महापालिकेत विकासासाठी कोटीच्या कोटी उड्डाणांचे नियोजन करण्यात येते. तेव्हा नदीकडेही थोडेसे पाहिले पाहिजे. शंभर वर्षापूर्वीची नदी हवी आहे. पूर्वी कुठलेही त्यात बांधकाम नव्हते. राम नदीमध्ये दहा किलोमीटरचा भाग पालिका हद्दीत येतो. त्यात कुठलाही दूषित पाण्याचा थेंब जाऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधीने प्रयत्न केले पाहिजे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणriverनदी