शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

वंधत्व आलेल्या जोडप्यांसाठी  सरोगसी तंत्रज्ञान हे वरदान : डॉ. इंदिरा हिंदुजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:26 PM

वंध्यत्वामुळे केवळ शरीरावर नव्हे, तर माणसाच्या मानसिक आरोग्यावर मोठा नकारात्मक परिणाम होतो. समाजदेखील अशा जोडप्यांकडे चुकीच्या नजरेने पाहतो. मात्र,

ठळक मुद्देपरिषदेला देशातील विविध राज्यांच्या १७ महिला आयोगाच्या प्रतिनिधींची हजेरी

पुणे : सरोगसी हा देशातील अत्यंत ज्वलंत विषय बनला आहे. याबाबत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी बोलले जात असले तरी प्रत्यक्षात सरोगसी हे उत्तम तंत्रज्ञान असून, वंध्यत्वाकरिता चांगली उपचार पद्धती आहे. वंध्यत्वामुळे केवळ शरीरावर नव्हे, तर माणसाच्या मानसिक आरोग्यावर मोठा नकारात्मक परिणाम होतो. समाजदेखील अशा जोडप्यांकडे चुकीच्या नजरेने पाहतो. मात्र, मुल असणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे कायद्याचा सुयोग्य वापर करून सरोगसी तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास वंध्यत्व असलेल्या जोडप्यांसाठी ते वरदान ठरेल, असे प्रतिपादन आयव्हीएफ तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करणा-या देशातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर इंदिरा हिंदुजा यांनी केले.     महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे सरोगसीसारख्या संवेदनशील विषयाच्या सर्वंकष पैलूंवर चर्चा करण्याकरीता आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद््घाटन डॉ.हिंदुजा यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, गुजरातच्या लिलाबेन अंकोलिया, गोव्याच्या शुभलक्ष्मी नाईक, हरियानाच्या प्रतिमा सुमन, झारखंडच्या कल्याणी शरण, मेघालयच्या थेलीन फानभो, महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्य सचिव डॉ.मंजुषा मोळवणे, सदस्या विंदा किर्तीकर, देवयानी ठाकरे, गयाताई कराड, आशा लांडगे आदी उपस्थित होते. वंध्यत्वावर वरदान ठरणा-या सरोगसी उपचारांसदभार्तील महत्वाचे विधेयक नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत मंजूर करण्यात आले. यापार्श्वभूमीवर आयोजित परिषदेला देशातील विविध राज्यांच्या १७ महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली.     डॉ.इंदिरा हिंदुजा म्हणाल्या, कामाचे तास, पती-पत्नीच्या नोकरीच्या असलेल्या वेगवेगळ्या वेळा, यांमुळे ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा जोडप्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला आयव्हीएफ तंत्रज्ञानाची गरज असतेच असे नाही. त्यात अनेकदा वंध्यत्वाची शंका आल्यास त्याचा दोष पुरुषांऐवजी महिलेला दिला जातो. प्रत्यक्षात पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही समान दोष असू शकतो. त्यामुळे केवळ महिलांना दोष न देतात पुरुषांसह समाजाने देखील ही बाब समजून घ्यायला हवी. सरोगसीमुळे एखाद्या ग्रामीण भागातील महिलेला आर्थिक मदत मिळत असेल, तर शासनासह आपलीही जबाबदारी आहे की आपण ती मदत महिलेला मिळवून देण्याकरीता सहाय्य करावे.     विजया रहाटकर म्हणाल्या, सरोगसी संदभार्तील विधेयक हे महत्वपूर्ण विधेयक असून त्याबद्दल देशात पहिली राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र महिला आयोगाने घेतली आहे. आता इतरही राज्यांनी अशा परिषदांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात हे विधेयक मंजूर होईल, मात्र त्याबाबत सामान्यांचे विचार काय आहेत, ते शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम आयोग करीत आहे. सन २००५ ते २०१६ या कालावधीत विधेयकासाठी काम सुरु होते. सन २०१६ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हे विधेयक मंजूर होत आहे. भारत सरोगसीचे मार्केट बनला असल्याची नकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही ओळख पुसून सरोगसीचे तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने पुढे आणण्याकरीता हे विधेयक नक्कीच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मंजुषा मोळवणे यांनी प्रास्ताविक केले. विंदा किर्तीकर यांनी सूत्रसंचालन केले.     

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी