शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथी डॉक्टरचा 'प्रताप'; परवानगी नसतानाही २२ वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 19:02 IST

परवानगी नसतानाही एका बावीस वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर या डॉक्टरने शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार

पुणे: तो होमिओपॅथी डॉक्टर. तरीही दवाखान्याबाहेर स्वत:च्या नावासमोर जनरल फिजिशन अँड सर्जन, तसेच, स्कीन स्पेशालिस्ट अँड सेक्सालॉजिस्ट' असा बेकायदेशीरपणे फलक त्याने लावला. शस्त्रक्रिया करण्याची या पॅथीच्या डॉक्टरला कोणतीही परवानगी नसतानाही एका बावीस वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर या डॉक्टरने शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी फेटाळला. 

डॉ. रितेश शहा (रा. लोहगाव) असे त्या डॉक्टरचे नाव आहे. महापालिकेतील आरोग्य विभागातील ४८ वर्षीय वैद्यकीय अधिका-याने याबाबत विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अँक़्ट १६१ मधील कलम ३३ आणि भादवी कलम ४२० सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा याने बी.एच.एम.एस. शिक्षण घेतले आहे. त्याने दवाखान्याच्या बाहेर डॉ. शहाज क्लिनिक' असा बोर्ड लावला आहे. वाघोली येथील एका तरूणाच्या गुप्तांगावर या डॉक्टरने शस्त्रक्रिया केली. त्या तरूणाला त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने महापालिका आरोग्य विभागाकडे याबाबतची तक्रार दिली. 

डॉक्टरने तरूणाकडून शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये घेतले. या प्रकरणात महापालिका आरोग्य विभागाने खात्री करून पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. शैक्षणिक अर्हता नसतानाही सर्जन आणि फिजिशियन असल्याचे दाखवून त्याने ही शस्त्रक्रिया केली आहे. यामुळे भविष्यात पीडिताच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. सर्वसामान्यांचा डॉक्टवरील विश्वास उडेल. दाखल गुन्ह्यात वापरलेले शस्त्रक्रियेचे साहित्य जप्त करायचे आहे. त्याच्याकडील शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जप्त करण्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अँड. प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdoctorडॉक्टर