पिंपरी पेंढारच्या सरपंचपदी सुरेखा वेठेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST2021-02-10T04:12:48+5:302021-02-10T04:12:48+5:30

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे आठ जागासाठी निवडणुका झाल्या. संतोष ...

Surekha Vethekar as Sarpanch of Pimpri Pendhar | पिंपरी पेंढारच्या सरपंचपदी सुरेखा वेठेकर

पिंपरी पेंढारच्या सरपंचपदी सुरेखा वेठेकर

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे आठ जागासाठी निवडणुका झाल्या. संतोष दुरगुडे, अमोल वंडेकर, संतोष कुटे, सुप्रिया दिनेश कुटे, संदीप रामदास वाघ, रूपाली विशाल कुटे, शैलेश विठ्ठल जाधव, दीपाली महेश कुटे, दत्तात्रय मारुती चव्हाण, सुवर्णा वेठेकर, शैला जाधव, अनिता कुटे, बळशीराम काशीनाथ खिल्लारी, सविता अभिनंदन पोटे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी कामगार तलाठी संजय गारकर, ग्रामविकास अधिकारी एस. एस. जंजाळ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

--

फोटो : ०९पिंपरी पेंढार सुरेखा वठेकर

फोटो - पिंपरी पेंढार येथील सरपंच सुरेखाताई वेठेकर तर उपसरपंचपदी अमोल वंडेकर*

Web Title: Surekha Vethekar as Sarpanch of Pimpri Pendhar