शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची सुप्रिया सुळेंना नवी जबाबदारी; पहिल्यांदाच 'या' क्षेत्रात करणार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:12 IST

खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांची साखर कारखानदारीत एंट्री

सोमेश्वरनगर : विधानसभेच्या अपयशानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर आल्या असून दोन दिवसांपूर्वी बारामतीत दूध व कांद्याच्या भावासंदर्भात आंदोलन केले होते. खा. सुळे आज सोमेश्वर कारखाना व माळेगाव कारखान्यावर ऊस उत्पादक सभासदांच्या ऊसाला मिळालेला पाहिल्या हप्त्याबाबत दोन्ही कारखान्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांची साखर कारखानदारीत एंट्री होत आहे.

आज सकाळी १० वाजता सोमेश्वर कारखाना व सकाळी ११ वाजता माळेगाव कारखान्यावर खासदार सुळे येणार असून ऊस उत्पादकांना मिळालेला पहिला हप्त्याबाबत कार्यकारी संचालक व संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. माळेगाव कारखान्यात १९८० सालापासून शरद पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत होते. तर सोमेश्वर कारखान्यात १९९२ पासून शरद पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत होते. शरद पवारांनी हळूहळू ही धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली.आजतागायत सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराचे संचालक मंडळ काम करत आहे. शरद पवारांनंतर साखर कारखानदारीचे सर्व सूत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडे घेतल्याने तसा खासदार सुप्रिया सुळे यांचा फारसा साखर कारखानदारीशी संबंध आला नाही. खा. सुळे या पहिल्यांदाच उद्या सोमेश्वर व माळेगाव कारखान्यावर ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी या दोन्ही कारखान्यावर येत आहेत. तसेच येत्या महिनाभरात माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागत आहे. तर दोन वर्षात सोमेश्वर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यानिमित्ताने खासदार सुळेंची एंट्री सर्वांच्या भुवया उंचावणारी आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार